Nanded BJP News : भाजपचे वाॅरिअर्स नांदेड काबीज करणार का?

Loksabha Election 2024 : नांदेड जिल्ह्यात लोकसभेची जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे.
ashok Chavan, pratap chikhlikar
ashok Chavan, pratap chikhlikar Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : निवडणूक छोटी असो की मोठी, राजकीय पक्ष ती युद्ध समजूनच लढत असतो. विरोधी पक्षाच्या गोटातील घडामोडींवर लक्ष ठेवून रणनिती आखणारा पक्ष नेहमी अशा युद्धात बाजी मारत असतो. भाजपने हे तंत्र सध्या चांगलेच आत्मसात केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठीची स्वतंत्र वाॅर रुम असो, की मग आता निवडणूक यंत्रणा हलवणारे वाॅरिअर्स असो. असे निराळे प्रयोग भाजप नेहमीच करत असते.

नांदेड जिल्ह्यात लोकसभेची (Loksabha Election) जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे. यात भाजपचे वाॅरिअर्स महत्वाची भूमिका बजावत आहेत. विरोधी पक्षाच्या हालचालीवर वाॅच ठेवण्यापासून ते गुप्त माहिती गोळा करण्याच्या कामात हे वाॅरिअर्स आपले कसब दाखवत आहेत. गेल्या दहा वर्षांत भारतीय जनता पक्षाने एक वेगळी निवडणूक यंत्रणा तयार केली आहे. यात आता या वाॅरिअर्सची भर पडली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हे योद्धे तयार असून मतदानकेंद्र निहाय बांधणी, गाव चलो अभियान, सोशल मिडिया आदीच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जात आहे. लोकसभा मतदारसंघाची व्याप्ती लक्षात घेता कोणत्याही पक्षाचा उमेदवार हा गावापर्यंत पोहचू शकत नाही. त्यामूळे ज्या पक्षाचे गाव, मतदान केंद्र पातळीवर काम आहे, अशा पक्षाच्या उमेदवाराला निवडणूक सोपी जाते. हे लक्षात घेऊन भाजपाने(bjp) प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय वाॅरिअर्स तयार केले आहेत.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात मिशन 45 चे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. ते गाठण्यासाठी सुक्ष्म असे नियोजन केले असून विविध माध्यमांतून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. शक्ती केंद्रप्रमुख, मतदान केंद्रप्रमुखांसह इतर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. निवडणूक (Election) वाॅर रुम तयार करण्यात आल्या असून या माध्यमातून निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. निवडणूकीची लढाई जिंकायची असेल तर सैनिकासारखे लढावे लागेल याची जाणीव भाजपने प्रत्येक मतदारसंघात नेमलेले शंभर वाॅरिअर्स पदाधिकारी, कार्यकर्त्यांना करून देत आहेत.

या योद्ध्यांना प्रशिक्षण देऊन निवडणूकीसाठी तयार केले गेले आहे. गावोगावी जाऊन मतदान केंद्र प्रमुखाला, पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन हे वाॅरिअर्स त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, कार्यकर्ते व पदाधिकारी सक्रियपणे काम करत आहेत की नाही ? यावर लक्ष ठेवून आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा कमळ फुलवण्यासाठी भाजपचे हे योद्धे निवडणूकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांना मतदान केंद्र प्रमुख, स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते यांची भक्कम साथ मिळणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

ashok Chavan, pratap chikhlikar
Loksabha Election : फडणवीसांच्या दोन शिष्यांमधून विस्तवही जाईना, लातूरमध्ये भाजप 'हॅटट्रिक' करणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com