`राष्ट्रवादी`च्या महापौरांचा एजेंडा `एमआयएम`च्याही एक पाऊल पुढे?

महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नागरीकांना धरलेय वेठीस
Mayor Tahera Shaikh & Rashid Shaikh
Mayor Tahera Shaikh & Rashid ShaikhSarkarnama

प्रमोद सावंत

मालेगाव : शहरात (Malegaon) राजकारणाचा आखाडा गाजतोय. एका मैदानावरून. सत्तारूढ गटाच्या महापौर ताहेरा शेख (Mayor Tahera Shaikh) व त्यांचा विरोधक `एमआयएम` (AIMIM) यांच्यात. येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमुळे कोण मतदारांचा जास्त हितचिंतक हे दाखविण्याच्या स्पर्धेत राष्ट्रवादीच्या (NCP) महापौरांनी शहरातील पोलिस कवायत मैदान थेट ईदगाह ट्रस्टला देण्याचा ठराव केला. मतदारांना धर्माची अफुची गोळी देण्याच्या नादात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते `एमआयएम`ला देखील मागे टाकता का काय? असा प्रश्न पडतो.

Mayor Tahera Shaikh & Rashid Shaikh
अजित पवार यांनी समाजाच्या सर्व घटकांना न्याय दिला!

महापालिकेतील सत्तारूढ गटाच्या या राजकारणाने राजकीय पक्षांना आयते कोलीत मिळाले. ऊर्दू घराला बीबी मुस्कान खान नाव देणे, कॉलेज व पोलिस कवायत मैदानावर सव्वा कोटी रुपये खर्चून साकारणाऱ्या जॉगींग ट्रॅकला विरोध अशा घडामोडी महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी सुरु आहे. त्यात नागरिकांनाही वेठीस धरले जातेय अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

Mayor Tahera Shaikh & Rashid Shaikh
महाविकास आघाडी नाशिकवर उदार...हायस्पीड रेल्वेला १६ हजार कोटी

महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेची युती आहे. राष्ट्रवादीने केलेल्या या ठरावाला भाजप, शिवसेनेचा विरोध आहे. विरोधात असलेल्या आघाडी व एमआयएमने तटस्थ असल्याचे चित्र निर्माण करीत ठरावाल अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. शासनाची जागा ईदगाह ट्रस्टच्या ताब्यात देण्याचा ठराव म्हणजेच शहरातील शांततेला गालबोट लावण्याचाच प्रकार आहे. विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल हे शहराचे पेशे इमाम आहेत. आम्ही ठराव केला. तुम्ही शासनाकडून मंजूरी मिळवून दाखवा, अशी कोंडी करत त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न माजी आमदार रशीद शेख, आसिफ शेख या पिता- पुत्रांनी केला.

मात्र, यामुळे भाजप, शिवसेनेला आयती संधी मिळाली. महासभेत प्रखर विरोध केल्यानंतर भाजपने हा ठराव शासनाने विखंडीत करावा, या मागणीसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. शिवसेनाही सरसावली. उपमहापौर निलेश आहेर यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना हा ठराव विखंडीत करावा, असे निवेदन दिले. महापालिकेचा या जागेशी काही संबंध नसताना महासभेत हा ठराव करण्याची व जॉगिंग ट्रॅकला विरोध करण्याची ईदगाह ट्रस्टला आवश्‍यकता नव्हती.

कॉलेज, पोलिस कवायत व ईदगाह मैदान खऱ्या अर्थाने शहरातील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. या मैदानावर १५ ऑगस्ट, २६ जानेवारीचे ध्वजवंदन, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय सभा-संमेलने, रमजान ईद, बकरी ईदचे नमाजपठण यासह असंख्य कार्यक्रम होतात. शहरातील क्रीडा प्रेमींसाठी हे एकमेव मैदान आहे. यामुळेच येथील चौकालाही राष्ट्रीय एकात्मता चौक नाव देण्यात आले आहे. तथापि, याच मैदानाचे निमित्त साधून शहरातील राजकारणी एकात्मतेचा गळा घोटण्यास निघाले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ‘बेईमानी इनका धर्म है, ये नेता बडे बेशर्म है, सेंक लेते है राजनीतिक रोटियां, जब देखे तवा गर्म है॥’ या ओळी शहरातील गलिच्छ राजकारणासाठी चपखल ठरतील.

मैदानाचा इतिहास भारी

अतिक्रमणाचे बादशाह असलेल्या या शहरात मध्यवर्ती भागातील २२ एकर क्षेत्रातील हे मैदान पिढ्यान पिढ्या मोकळे व अतिक्रमणमुक्त कसे याचा शोध घेतला असता रंजक माहिती समोर येते. इंग्रजांच्या राजवटीत भुईकोट किल्ला ताब्यात घेताना झालेल्या युद्धात इंग्रज सैन्यातील मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांचे दफन या मैदानावर झालेले आहे. पुर्वाश्रमीची ही दफनभूमी आहे. दफनभूमी व स्मशानभूमीवर अतिक्रमण करु नये अशी लोकमान्यता होती. त्यामुळेच हे मैदान अतिक्रमणमुक्त राहिले. मात्र, कधीकाळी दफनभूमी व स्मशानभूमी असलेली जमिन आज राजकारणाची चिता बनली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खालीद इरफान यांच्या ‘जाने कब इस में हमे आग लगानी पड जाए । हम सियासत के जनाजे को चिता कहते है ॥ या पक्तींची आठवण होते.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com