Chandrashekhar Bawankule : पवार, ठाकरे अन् काँग्रेसला सत्तेत कधीपर्यंत वाव नसणार; मंत्री बावनकुळेंनी 'साल' सांगितलं

BJP Minister Chandrashekhar Bawankule Maha Vikas Aghadi press conference Amravati : भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती इथं पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर टीका केली.
Chandrashekhar Bawankule 2
Chandrashekhar Bawankule 2Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics 2025 : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाला. महायुतीला सर्वात मोठं बहुमत मिळालं. राज्यात महायुती सरकार स्थापन होऊन आता दोन अधिवेशनं झाली. या सत्ता स्थापनेनंतर महायुती आणि महाविकास आघाडीमधील राजकीय संघर्ष अधिकच वाढला आहे.

नागपूरनंतर मुंबईत झालेले अधिवेशन कामकाजापेक्षा आरोप-प्रत्यारोपांनी चांगलेच गाजले. आता भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्या अमरावती इथून महाविकास आघाडीच्या प्रमुखांना चांगलेच डिवचलं आहे.

भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी (MVA) कधीपर्यंत सत्तेत येणार नाही, याचे 'साल' सांगत चांगलेच डिवचलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे 2047 पर्यंत कोणताही वाव नाही. विकसित भारताचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. विकसित भारताला साथ देण्यासाठी संपूर्ण देश मोदींच्या मागे आहे, असे सांगून 2047 पर्यंत महाविकास आघाडीला वाव नाही, असे मंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Chandrashekhar Bawankule 2
Ashish Shelar praises Raj Thackeray : राज ठाकरेंचा 'दानपट्टा' फिरणार? 'मनसे'च्या गुढीपाडवा मेळाव्यापूर्वीच भाजप मंत्री शेलारांनी गोंजारलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विकसित भारताबरोबर महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी राज्यातील जनता त्यांच्या मागे उभी आहे, त्यामुळे काँग्रेस व महाविकास आघाडीने 2047 पर्यंत वाट बघावी, 2047 पर्यंत विरोधी पक्षात चांगलं काम करावं लागेल, असे मंत्री बावनकुळे यांनी म्हटले.

Chandrashekhar Bawankule 2
Poorest state in India: भारतातील 'या' राज्यात राहतात सर्वाधिक गरीब?

वक्फ बोर्डबाबत केंद्रीय पातळीवर कायदा सुरू आहे. महाराष्ट्र मध्ये वक्फ बोर्डने ज्या साधारण शेतकऱ्यांच्या आणि हिंदू मंदिरांच्या ज्या जागा बळकावल्या असेल, या जागा परत मिळवण्यासाठी मी आणि सरकार पूर्ण प्रयत्न करणार आहे, बख्त बोर्डाकडे कोणत्याही नियमाच्या बाहेर जागा राहणार नाही, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

संभाजी भिडे अन् भाजप मंत्री नीतेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे कट्टर हिंदुत्ववादी होते, असे विधान केले आहे. त्यावर भाजप मंत्री बावनकुळे म्हणाले, "शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती कोणा एका पुरती नव्हती. तसा त्यांचा इतिहास हा एका जाती करिता नाही, सर्व जाती-धर्माचा समावेश स्वराज्यात आहे". सर्व राजकीय नेत्यांना विनंती करताना, समाजामध्ये तेढ निर्माण करणारे कोणतेही विषय राजकारणी लोकांनी बोलू नये, महाराष्ट्राचे संस्कृती कायम ठेवली पाहिजे यासाठी सर्वांनी काम करावे, असेही मंत्री बावनकुळे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com