Prajakt Tanpure BJP Joining : 'प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश पक्का, विधान परिषद उमेदवारीवरही शिक्का'; मामा जयंतरावांचे प्रयत्न निष्फळ!

Prajakt Tanpure likely BJP entry and Legislative Council nomination spark major political buzz in Maharashtra : सुप्रिया सुळेंची भेट, राजीनाम्याच्या चर्चा आणि दुसरीकडे विधान परिषदेसाठी भाजपकडून एबी फॉर्मची तयारी, असे राजकीय गणित प्राजक्त तनपुरेंनी जुळवले असून, उद्या पक्ष प्रवेश वेळ निश्चित झाली आहे.
Prajakt Tanpure BJP Joining
Prajakt Tanpure BJP JoiningSarkarnama
Published on
Updated on

NCP Sharad Pawar Group Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. 30) मुंबईत तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विशेष म्हणजे, भाजप प्रवेशासोबतच त्यांची विधान परिषद उमेदवारीही निश्चित झाल्याचे बोलले जात असून, त्यामुळे शरद पवार गटाला अहिल्यानगरमध्ये मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

दरम्यान, प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना अचानक वेग आला होता. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, तनपुरे यांनी पक्षातील विविध पदांचे राजीनामे दिल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

सुळेंच्या भेटीनंतर तनपुरेंचा भाजप (BJP) प्रवेश थांबणार, अशी चर्चा रंगली होती. या संपूर्ण घडामोडींमागे त्यांचे मामा आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केल्याचेही बोलले जात होते. मात्र, या सर्व हालचालींनंतरही तनपुरेंचा भाजप प्रवेश आणि विधान परिषद उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त पुन्हा समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

Prajakt Tanpure BJP Joining
Jayant Patil And Prajakt Tanpure : जयंत पाटलांनी गेम फिरवला? सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशांच्या चर्चांना ब्रेक? उद्याच्या भूमिकेकडे लक्ष

सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी तीन वाजता मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात तनपुरेंचा अधिकृत पक्ष प्रवेश होणार आहे. याचवेळी त्यांना विधान परिषद निवडणुकीसाठी एबी फॉर्मही दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजपने अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी रणनीतिक खेळी केल्याचे मानले जात आहे.

Prajakt Tanpure BJP Joining
Sachin Jagtap MLC Election : प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर? ससाणे-जगताप-भोसले यांनी नेले अर्ज, अहिल्यानगरच्या राजकारणात पुढील 48 तास निर्णायक

राहुरीतही तनपुरे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, अनेक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होण्याच्या तयारीत असल्याचे समजते. भाजप प्रवेशानंतर तनपुरे सोमवारी अहिल्यानगरमध्ये दाखल होत विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. अर्ज दाखल प्रक्रियेसाठी समांतर तयारी सुरू असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे, भाजप प्रवेश, उमेदवारी आणि पुढील राजकीय भूमिका याबाबत प्राजक्त तनपुरे अत्यंत संयमाने पावले टाकताना दिसत आहेत. कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया न देता चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची त्यांची रणनीती असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. दरम्यान, तनपुरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या मोबाईलवर नंतर संपर्क करतो, असा व्हॉइस मेसेज ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आता शनिवारी होणाऱ्या संभाव्य भाजप प्रवेशाकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

तनपुरेंना ईडी चौकशीत दिलासा

प्राजक्त तनपुरे हे राज्यमंत्री होते. राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना तोट्यात निघाल्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्त केला. यानंतर 2012 मध्ये या कारखान्याचा लिलाव जाहीर झाला. हा कारखाना तोट्यात खरेदी केल्याचा ईडीला संशय होता. यातून सुरू झालेल्या ईडी चौकशीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या काळात न्यायालयाने त्यात प्राजक्त तनपुरे यांना दिलासा देणारा निर्णय दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com