Lok Sabha Election 2024 : 'मिशन 45'साठी महायुतीचे महत्त्वाचे पाऊल, एकाच वेळी 36 ठिकाणी...

Mahayuti : भाजपने लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. या जागा जिंकून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प आहे.
Ajit pawar, Eknath shinde, Devendra fadnavis
Ajit pawar, Eknath shinde, Devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Meetings For Election : महायुतीमध्ये प्रमुख तीन पक्ष असले तरी एकूण 15 पक्षांचा समावेश महायुतीमध्ये आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीमधील पक्षांमध्ये समन्वय असणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा दौऱ्यानंतर राज्यात ३६ ठिकाणी एकाच वेळी बैठका होत आहेत. या बैठकीत लोकसभेच्या आगामी निवडणुकीत 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा निर्धार केला जाणार आहे.

भाजपने लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. या जागा जिंकून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प भाजपने केला आहे. त्यासाठी सर्व घटक पक्षांनी निवडणुकीपूर्वी परस्परांतील किरकोळ मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने एकच लक्ष्य ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात आजच्या बैठकीत विचार विनिमय व परस्परांतील चर्चेला चालना देऊन उत्तम समन्वय साधण्यासाठी पहिले पाऊल टाकले जाणार आहे. अन्य सर्व पक्षांच्या तुलनेत अधिक जोमाने व आत्मविश्वासाने आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ असा संदेश आजच्या बैठकीतून दिला जाणार आहे, असे भाजपचे प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

Ajit pawar, Eknath shinde, Devendra fadnavis
NCP News : अजित पवार औरंगजेबाचे पाठीराखे झालेत का? राष्ट्रवादीतच जुंपली...

नाशिकची बैठक आज (रविवारी) सातपूर येथील डेमोक्रेसी या कार्यालयात होणार आहे. यावेळी घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील. अशाच यापुढे विधानसभा आणि बूथ स्तरावर देखील घेण्यात येतील. केला सर्व त्या त्या भागातील मंत्री,पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित राहतील. निवडणुकीच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बैठक असल्याने या निमित्ताने राज्यात भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी पहिले पाऊल टाकले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीत असलेले पक्ष

राज्यात महायुतीच्या भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या प्रमुख पक्षांसह १५ घटक पक्षांचा या युतीमध्ये समावेश आहे. यामध्ये आरपीआय (आठवले गट), पी.आर.पी., बहुजन विकास आघाडी, जे. एस. एस., आर.एस.पी., पी.जे.पी., स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, ब. रि. एकता मंच, आरपीआय (खरात गट) आणि शिवसंग्राम अशा १५ पक्षांचा समावेश आहे या सर्व पक्षांचे एकत्रित मोट बांधण्यासाठी नेत्यांमध्ये समन्वय आणि स्थानिक वाद मिटवून एकत्र काम करण्याची मानसिकता घडविण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आज राज्यात ३६ ठिकाणी हे मिळावे होत आहेत

आरपीआयचा दोन जागांवर दावा

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जागावाटपाचे सूत्र आणि धोरण अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत सहभागी होणाऱ्या घटक पक्षांकडून विविध जागांची मागणी होण्याची शक्यता आहे विशेषतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून दोन जागा हव्यात ही भूमिका यापूर्वीच व्यक्त झाली आहे. 'रासप'ला देखील एक जागा हवी आहे. तसे न झाल्यास वेगळ्या निर्णय घेण्याची मानसिकता या पक्षाकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आजच्या बैठकीला विशेष महत्त्व दिले जात आहे.

Ajit pawar, Eknath shinde, Devendra fadnavis
Ahmednagar OBC Rally : नगरमध्ये 'OBC'ची जंगी सभा घ्या, भुजबळांना नेत्यांचे साकडे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com