शहरातील २३ खेड्यांच्या विकासाला राष्ट्रवादी देणार प्राधान्य

आगामी महापालिका निवडणुकीत लोकांसमोर जाताना शहरात समाविष्ट असलेल्या २३ खेड्यांचा विकास प्राधान्याचा विषय आहे.
NCP Office bearers of Nashik
NCP Office bearers of NashikSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीत लोकांसमोर जाताना शहरात समाविष्ट असलेल्या २३ खेड्यांचा विकास, गावठाण विकास, मेडिकल टुरिझमला पोषक वातावरण व वाचनसंस्कृती यांसह स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी ताकदीने उतरण्यासाठी अभ्यासिका व वाचनालये उभारण्याचे ध्येय ठेवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आश्‍वासन दिले.

NCP Office bearers of Nashik
छगन भुजबळ म्हणतात, `मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती`

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी ऑगस्टमध्ये सहा विभागांमध्ये विशेष मोहीम राबविली. मोहिमेंतर्गत महिला व युवकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा नाशिककरांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आल्या. नाशिककरांच्या जाहीरनाम्याचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडे सुपूर्द करण्यात आला. नाशिककरांच्या जाहीरनाम्याचे स्वागत करताना शहर विकासाला दिशादर्शक जाहीरनामा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

NCP Office bearers of Nashik
भाजप-शिवसेनेत राजकारण टोकाला, हा कचरा आहे की सोने!

नाशिककरांच्या जाहीरनाम्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे व्हीजन शिष्टमंडळाने मांडले. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी भूमिका स्पष्ट केली. आमदार सरोज आहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, ज्येष्ठ नेते मधुकर मौले, विभाग अध्यक्ष जीवन रायते, पश्‍चिम विभाग अध्यक्ष किशोर शिरसाट, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोवर्धने आदी उपस्थित होते. आमदार आहिरे म्हणाल्या, की महापालिकेत समाविष्ट होऊनही २३ खेडे अविकसित राहिली. ठाकरे म्हणाले, की पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरात आणावे लागेल. वैद्यकीय उपचारासाठी उत्तर महाराष्ट्रातून नागरिक नाशिकमध्ये येतात. त्याच अनुषंगाने मेडिकल टुरिझम विकसित करण्याची संधी आहे. विकासासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरेल. नाना महाले यांनी मेट्रो शहरांचा अभ्यास करून त्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली.

नेते म्हणतात...

महापालिकेत समाविष्ट होऊनही २३ खेड्यांचा हवा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे खेड्यांच्या विकासाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. महिलांना रोजगारासाठी स्वतंत्र मार्केटची आवश्‍यकता आहे.

- सरोज आहिरे, आमदार

...

झीरो डिस्चार्ज वॉटर सिस्टिम, आरोग्य, शिक्षण व्यवस्था भक्कम करण्याबरोबरच उपयोगात नसलेल्या महापालिकेच्या जागांवर महिला बचतगटासाठी रोजगाराची संधी निर्माण करणे गरजेचे आहे.

- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

...

पालकमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी पाच ते सहा हजार कोटींचे प्रकल्प शहर व जिल्ह्यात आणले. त्यामुळे विकासासाठी दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची आवश्‍यकता आहे.

- नाना महाले, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

...

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याबरोबरच स्वच्छ व सुंदर शहराचा नावलौकिक कायम राहण्यासाठी पर्यावरण पूरकतेवर भर दिला पाहिजे. शहरातील रस्ते सुस्थितीत आणणे गरजेचे आहे.

- अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

...

मोकळ्या मैदानाचा विकास करण्याबरोबरच सुरक्षिततेसाठी शहरात सीसीटीव्ही बसविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार राहील.

- किशोर शिरसाट, विभाग अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com