Nashik NCP News : राष्ट्रवादी गौतमी पाटील यांच्यावर संतापली? हे आहे कारण...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्षांची पोलिसांकडे कारवाईची मागणी
Ambadas Khaire & Guatami Patil
Ambadas Khaire & Guatami PatilSarkarnama
Published on
Updated on

Gautami Patil News : बहुचर्चीत नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या शहरात झालेल्या एका कार्यक्रमात युवकांनी गोंधळ घातला. त्यामुळे हा कार्यक्रम नियंत्रणाबाहेर गेला. त्यात काही युवकांनी पत्रकारांना मारहाण केल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. (There was a mess in Gautami Patil performed programme of Nashik)

याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांनी आयोजकांच्या ढिसाळ संयोजनाबाबत नाराजी व्यक्त केली. गौतमी पाटील (Gautami Patil) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

Ambadas Khaire & Guatami Patil
Sinner APMC election : माणिकराव कोकाटे सावध...एक संचालक अलिप्त?

गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. यासंदर्भात गौतमी पाटील यांना नाशिक जिल्हा बंदी करून तिच्यावर गुन्हा दाखल करावा असे अंबादास खैरे म्हणाले.

नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात वार्तांकण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील सहभागी मद्यपी प्रेक्षक, तरुणांनी मारहाण केली. या घटनेत पत्रकार गंभीर जखमी झाले आहे.

Ambadas Khaire & Guatami Patil
Nashik ACB News: नेत्यांकडून ३० लाख घेणाऱ्या `त्या` अधिकाऱ्याने कामगारांकडून ९३ लाख घेतले?

नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे शहरात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना येथील मद्यपी कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यामुळे यामध्ये पत्रकारांना गंभीर दुखापत झाली. या घटनेसाठी सर्वस्वी गौतमी पाटीलला जबाबदार धरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच नाशिकमध्ये असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी नाशिक जिल्ह्यात गौतमी पाटीलला पूर्णतः बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com