राजकीय चमचेगिरीच्या तोंडावर बँक प्रशासकांनी भिरकावला राजीनामा?

जिल्हा बँकेला अडचणीतून बाहेर काढणाऱ्या प्रशासकांच्या मार्गात राजकीय अडथळे
NDCC Bank Head Quarter Building

NDCC Bank Head Quarter Building

Sarkarnama

Published on
Updated on

नाशिक : राजकीय नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त व संशयास्पद कामगिरीमुळे अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकेवर (NDCC Bank) प्रशासकांची नियुक्ती झाली होती. प्रशासक योग्य काम करीत असतांना दुसऱ्या फळीतील अकार्यक्षम व राजकीय वळचणीला बांधलेल्या अधिकाऱ्यांच्या अडचणीमुळे राजकीय दबाव असल्याची चर्चा होती. त्याला चोख उत्तर म्हणून प्रशासकांनी या दबावाच्या तोंडावर आपला राजीनामा भिरकावला आहे. त्यामुळे बँकेच्या भवितव्याबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाल्याचे बोलले जाते.

<div class="paragraphs"><p>NDCC Bank Head Quarter Building</p></div>
पोलिस आयुक्त पांडे, आमदार पवारांनी धरला डोंगऱ्यादेव उत्सवात ठेका

येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक महम्मद आरिफ (Chief administrator Mohd. Arif) यांनी व्यक्तिगत कारण देत प्रशासकपदाचा राजीनामा सहकार आयुक्तांकडे पाठविला आहे. यासह प्रशासकीय मंडळाचे सदस्य चंद्रशेखर बारी (Chandrashekhar Bari) यांनी देखील राजीनामा दिला आहे. यामुळे बँकेवर आता प्रशासक राहिले नाहीत. जिल्हा बँकेत प्रशासक म्हणून काम करत असताना अनेक अडचणी व राजकीय दबाव येत असल्याने श्री. आरिफ यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

<div class="paragraphs"><p>NDCC Bank Head Quarter Building</p></div>
हीना गावित कडाडल्या, खर्चाची खोटी बीले देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा!

डिसेंबर २०१७ मध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरकारभाराचा ठपका ठेवत भारतीय रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. राज्य शासनाने २२ मार्चला शासनाकडून बँकेवर प्रशासक म्हणून तीन सदस्यीय प्रशासक मंडळ नेमण्यात आले. त्यानुसार सहकारी संस्थांचे सहाय्यक आयुक्त महम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखालील या प्रशासक मंडळात सहकारी संस्थांचे उपनिबंधक चंद्रशेखर बारी, तसेच सनदी लेखापाल तुषार पगार यांच्याकडे बँकेचे प्रशासक म्हणून जबाबदारी दिली. तुषार पगार यांनी मात्र कारभार स्वीकारलाच नाही.

प्रशासक म्हणून नऊ महिन्यांमध्ये दोघा प्रशासकांनी बँकेची कर्जवसुली चांगल्या प्रकारे केली. पीककर्जाचेदेखील चांगले वितरण केले. यासह बँकेचा एनपीए कमी करण्यातही यश मिळाले; परंतु मागील काही दिवसांपासून नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने दबाव येत होता. सरकारने गुणवत्तेच्या आधारावर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्यामुळे हा कारखाना चालविण्यास घेण्यास एकच निविदा आल्यामुळे त्यांनी रद्द केली. ही निविदा रद्द झाल्याने त्यांच्यावर सतत राजकीय दबाव टाकला जात होता म्हणून आरिफ यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे; परंतु वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगत राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्याने सहकार आयुक्त यापुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com