जळगाव : जिल्हा (Jalgaon) नियोजन विभागातर्फे महापालिकेला (Municiple corporation) आगामी वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीची कामे थांबविण्यात यावीत. नवीन पालकमंत्री (Guardian minister) आल्यानंतरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पत्र जिल्हा नियोजन विभागाने महापालिकेस पाठविले आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाल्याचा फटका महापालिकेसह विविध यंत्रणांना बसला आहे. (District planing department wrote a letter to Jalgaon Municiple corporation)
याबाबत बांधकाम विभागास हे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे शहरातील काही विकासकामे आता थांबली असून, नवीन पालकमंत्री येण्याची प्रतीक्षा आहे.
राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. पण मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. त्यामुळे राज्यात कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. परिणामी अनेक कामे खोळंबली असून, त्याचा विकासकामावरही परिणाम होत आहे. राज्यात मंत्रिमंडळ नसल्याची झळ आता स्थानिक स्तरावर बसू लागल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात तर त्याचा फटका बसत आहेच; परंतु शहरी हद्दीतीही नागरिकांना त्याचा त्रास जाणवू लागला आहे.
शहरात विकासासाठी तसेच काही कामासाठी जिल्हा नियोजन (डीपीडीसी) मंडळाकडून निधी मिळत असतो. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री असतात, त्यांच्याच मान्यतेने विविध विकासकामांसाठी निधी मंजूर केला जातो. त्यानुसार तो वितरीत केला जातो. माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव शहराच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे त्यातून ही कामे होणार होती, त्याचे नियोजनही महापालिकेतर्फे करण्यात आले होते.
नियोजन मंडळाचे पत्र
राज्यात नवीन सरकार स्थापन झाले, मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे जिल्ह्यात पालकमंत्री नियुक्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मंजूर निधी वितरीत करण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हा नियोजन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेस पत्र पाठविले आहे. २०२२-२३ साठी जिल्हा नियोजन मंडळाकडून विकासकामांसाठी जो निधी देण्यात आला आहे त्यातील कामे करू नयेत. नवीन पालकमंत्री येईपर्यंत ही कामे करू नयेत, असेही कळविण्यात आले आहे. महापालिकेचे नगरोत्थान निधी व दलित वस्ती सुधार निधी अशा दोन निधीतून साधारणत: दहा ते बारा कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यामुळे आता या निधीतून महापालिकेची कामे थांबणार आहेत.
पालकमंत्र्यांची प्रतीक्षा
शहरातील काही विकासकामांसाठी आता नवीन पालकमंत्र्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन नवीन पालकमंत्री येईपर्यंत जळगाव शहरातील काही विकासकामे थांबणार हे मात्र निश्चित.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.