Devyani Pharande News : गोदा आरती बैठकीवरून नवा राजकीय वाद?

Nashik BJP News : भाजप आमदार फरांदे यांच्या बैठकीला गोदा आरती समितीच्या सदस्यांनी फिरवली पाठ
Devyani Pharande News : Nashik BJP News :
Devyani Pharande News : Nashik BJP News : Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik News : वाराणसीच्या धर्तीवर नाशिकच्या गोदावरी नदीची आरती करण्यासाठी राज्य शासनाने ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यासाठी समितीदेखील स्थापन केली. याच अनुषंगाने कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी बुधवारी (ता.१४) महापालिका मुख्यालयात बैठक घेतली. बैठकीत मात्र समिती सदस्य अनुपस्थित होते, तर महापालिका अधिकाऱ्यांना त्यांनी विविध सूचना केल्या. (Latest Marathi News)

Devyani Pharande News : Nashik BJP News :
Dilip Borse Vs Deepika Chavan: आमदार दिलीप बोरसे अन् राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाणांमध्ये वाद पेटला; म्हणाले, 'येत्या निवडणुकीत..'

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाराणसीच्या धर्तीवर गोदा आरती उपक्रमाला मान्यता दिली आहे. त्यासाठी १४ जणांची समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. गोदा आरती संदर्भात समितीची आतापर्यंत बैठक पार पडली नाही. आमदार फरांदे यांनी महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेत गोदा आरती संदर्भातील आढावा घेतला.

मात्र समितीच्या १४ सदस्यांचे मत जाणून घेणे अपेक्षित असताना त्यातील एकही सदस्य बैठकीला उपस्थित राहिला नव्हता. विशेष म्हणजे महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक उपस्थित नसताना त्यांच्या दालनात आमदार देवयानी फरांदे यांनी बैठक घेतल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

Devyani Pharande News : Nashik BJP News :
NCP Nagpur News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत उफाळली गटबाजी, फायदा भाजपला !

समिती सदस्यांपैकी कोणीही आम्हाला बैठकीला निमंत्रित केले नसल्याची माहिती देण्यात आली. गोदा आरतीची सर्वाधिक संबंध असलेल्या आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी मात्र निमंत्रण दिल्याचे सांगताना निकटवर्ती यांचे निधन झाल्याने उपस्थित राहता आले नसल्याचे सांगितले. बैठकी संदर्भात झालेल्या वादाची माहिती नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्टीकरण दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com