

Ganesh festival DJ ban : "ढोल-ताशा, लेझिम अन् रस्ते यात, जर विद्यानंद बापट आडवा येत असेल, आणि त्याला 'विशिष्ट' लोक मदत करत असतील, तर सगळ्यांचे 'ढोल' होतील," असा इशारा संग्रामबापू भंडारे महाराज यांनी दिला आहे.
नेवासा येथे सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चात त्यांनी डीजे-लेझर लाइट बंदवर प्रतिक्रिया देताना, विद्यानंद बापट यांचा ऐकरी आणि त्यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाण याचा 'भाऊ', असा उल्लेख केला आहे.
संग्राम भंडारे महाराज यांनी गणेशोत्सवात डीजे-लेझर बंदीचे समर्थन करत, विद्यानंत बापटच्या अगोदरपासून आमची ही भूमिका आहे, त्यावेळी विद्यानंद बापट हा कोणालाही माहिती नव्हता, असे सांगितले. बाटप याने डीजेला विरोध करताना, नंतर वळणाचं पाणी वळणाला गेले अन् ढोल-ताशा आणि लेझिम पण नको म्हणू लागला. ढोल-ताशा आणि लेझिम हे हिंदू (Hindutwa) धर्माचे प्रतीक आणि वाद्य आहे, असा दावा भंडारे महाराज यांनी केला.
ढोल-ताशा आणि लेझिमला विरोध करणारा भारतीय अन् महराष्ट्रीयन (Maharashtra) कसा असू शकतो? रस्त्यांवरून मिरवणूक नका म्हणतोय, रस्ता काय बापाच्या आहेत का? हे रस्ते हिंदूंचे आहेत, असा घणाघात भंडारे महाराज यांनी केला.
विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाण याच्या भूमिकेचे समर्थन करताना, संतोषभाऊ असा उल्लेख करत त्यांची भूमिका समजावून घेतली पाहिजे, असे भंडारे महाराज यांनी म्हटले. ढोल-ताशा, लेझिम आणि रस्त्यांच्या बाबतीत विद्यानंद बापट आडवा आला, आणि त्याच्या समर्थनात विशिष्ट लोक मदत करत असतील, तर सगळ्याचे ढओल होतील, असा इशारा भंडारे महाराज यांनी दिला.
मिरवणुकांचे रस्ते बंद करा म्हणतोय, हा काय बाप झालाय का? विद्यानंद बापट कोण आहे? हा काल परवा आलाय, कोणाला माहित नाही. विद्यानंद बापट यांच्यावर संतोष चव्हाणची प्रतिक्रिया उत्स्फूर्त होती. आम्ही संस्कृती रक्षक, संस्कृती भक्षक नाही, असे सांगताना सांस्कृतिक परंपरांना विरोध करणाऱ्यांचे ढोल केले जातील, असा शेवटी पुनरूच्चार भंडारे महाराज यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.