

TCS Nashik Conversion Case : नाशिकच्या बहुचर्चित TCS कंपनीतील महिला लैगिंक अत्याचार व धर्मांतर प्रकरणातील संशयित फरार आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामीनावर सोमवारी (दि. २७ नाशिकरोड न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. परंतु न्यायालयाने निकाल राखीव ठेवला असून २ मे रोजी जामिनावर निकाल देणार आहे. त्यामुळे निदा खानला अटक होते की बेल मिळते याचा फैसला आता २ मे रोजीच होणार आहे.
TCS प्रकरणात सात महिला व एका पुरषाने तक्रारी दिल्या आहेत. त्यातील एका पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ मार्च २०२६ रोजी संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार व निदा खान यांच्यावर गुन्हा दाखल आहे. यातील संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार या दोघांना अटक असून, सध्या ते मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीतील गुन्ह्यांतर्गत ‘SIT’च्या ताब्यात आहेत. तर, संशयित निदा खान ही फरार आहे.
फरार निदा खानने नाशिकरोड न्यायालयात जामीनसाठी अर्ज केलेला आहे. या अर्जावर सोमवारी (दि. २७) सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी प्रभावी युक्तिवाद करीत तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली.
निदा खान हीने पीडीत तरुणीवर कशापद्दतीने दबाव टाकला व पीडितेला तिच्या धर्मावरून हिणवले. तसेच पीडितेच्या मनात भीती घालून तिला धर्मांतरासाठी बुरखा, धार्मिक पुस्तके दिली. तसेच तिचे नाव बदलून हानिया ठेवण्यात आलं. पीडितेच्या धर्मांतराच्या प्रयत्न झाला. मालेगाव येथे धर्मांतरासंदर्भातील कागदपत्रे बनविण्यात आली. निदाने पीडितेच्या मोबाईलमध्ये इस्लाम धर्मासंदर्भातील रील्स, यू ट्यूब लिंक पाठविल्या गेल्या. रोजा पठण, हिजाब परिधान याबाबतची माहिती पीडितेला दिली. तिला मलेशियात पाठविण्याचेही कारस्थान निदा खानसह संशयितांचे होते, असा दावा करीत यात ‘मनीट्रेल’ झाल्याचाही संशय व्यक्त केला.
दरम्यान, बचाव पक्षाचे वकील राहुल कासलीवाल यांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद खोडून काढताना महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदाच नाही. उत्तर प्रदेश सरकारचा कायदा आहे, अन्य राज्यांत कायदा नाही. धर्मांतराचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही असे सांगत सांगत निदा खान ही गरोदर असल्याने तिच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याची मागणी केली.
त्यावर महाराष्ट्रात धर्मांतराचा कायदा नाही, पण धार्मिक भावना हेतुपुरस्तर दुखावणे गुन्हा आहे. याप्रकरणात निदा खानची चौकशी होणे आवश्यक आहे. निदाच्या मोबाईलमधून अनेक माहिती मिळण्याची शक्यता आहे. निदा गरोदर असली, तरी तिला वैद्यकीय सेवा पुरविण्याची हमी शासनाची असल्याचा युक्तिवाद ॲड. मिसर यांनी केला व निदाच्या अटकपूर्व जामिनाला हरकत घेण्यात आली .
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.