Nirmala Gavit News : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! निर्मला गावितांनीही सोडला पक्ष; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश

Nirmala Gavit quits Uddhav Thackerays party to join Eknath Shinde's Shiv Sena : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
Former MP Nirmala Gavit joins Eknath Shinde’s Shiv Sena
Former MP Nirmala Gavit joins Eknath Shinde’s Shiv Senasarkarnama
Published on
Updated on

Nirmala Gavit Resigns from Uddhav Thackeray’s Shiv Sena : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सतत कोणते ना कोणते धक्के बसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी पक्ष सोडलेला असताना, त्यापाठोपाठ आज(मंगळवार) माजी आमदार निर्मला गावित यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

माजी आमदार निर्मला गावित यांनी केवळ ठाकरे गटच सोडला नाही, तर त्या उद्या(बुधवार) सकाळीच ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा फारसा प्रभाव नाही. मात्र आता माजी आमदार गावित यांच्या प्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेला आगामी निवडणुकीसाठी चांगलं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच निर्मला गावित यांचा राजीनामा हा ठाकरे पक्षाला धक्का तर उपमुख्यमंत्री शिंदे यांना लाभदायी ठरणार असल्याचे दिसते.

Former MP Nirmala Gavit joins Eknath Shinde’s Shiv Sena
MNS News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर आता महिला आयोगाबाबत 'मनसे'चीही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

निर्मला गावित या काँग्रेस पक्षाच्या इगतपुरी मतदार संघातील दोन टर्म आमदार होत्या. त्यांनी २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची तयारी दाखवली होती. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वातील मतभेदांमुळे तो प्रवेश होऊ शकला नाही.

Former MP Nirmala Gavit joins Eknath Shinde’s Shiv Sena
Bangladesh political crisis : युद्धजन्य परिस्थिती!, युनूस यांचा हट्ट अन् लष्कराचा दबाव ; अखेर कोणत्या दिशेने जातोय बांगलादेश?

तर गेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीमती गावित यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून घोषित केले होते. या निवडणुकीत पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. मात्र त्या पराभूत झाल्या.

Former MP Nirmala Gavit joins Eknath Shinde’s Shiv Sena
Ajit Pawar in Baramati : बारामतीला पावसाचा जबरदस्त फटका अन् अजितदादा तत्काळ ॲक्शन मोडवर!

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना इगतपुरी येथे येऊन दूर गेलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वात गोंधळ असल्याने पक्षासाठी हे काम कोणीही करू शकले नाही. संदर्भात नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नेते देखील उदासीन असल्याने या पक्षाची अवस्था बिकट झाल्याचे दिसते. त्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही हा धक्का मानला जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com