Nirmala Gavit Politics: अपक्ष निर्मला गावित यांनी वाढवली हिरामण खोसकर यांची डोकेदुखी?

Nirmala Gavit; Rebel Gavit became headache for Congress and MLA Hiraman Khoskar-महाविकास आघाडीची यंत्रणा उघडपणे अपक्ष उमेदवार गावित यांच्या प्रचारात उतरल्याने वाढली चुरस
Hiraman Khoskar & Nirmala Gavit
Hiraman Khoskar & Nirmala GavitSarkarnama
Published on
Updated on

Assembly election 2024: इगतपुरी विधानसभा मतदार संघाची निवडणूक अधिकृत उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवार माजी आमदार निर्मला गावित यांच्यामुळेच अधिक चर्चेत आली आहे. आमदार हिरामण खोसकर यांना ती डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

इगतपुरी- त्रंबकेश्वर मतदार संघात काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर क्रॉस वोटिंग मुळे पक्षाच्या उमेदवारीला मुकले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली. विद्यमान आमदार म्हणून विविध भागातील कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात आहेत. मात्र त्यांना मोठे आव्हान मिळाले आहे, ते अपक्ष उमेदवार माजी आमदार निर्मला गावीत यांच्याकडून.

Hiraman Khoskar & Nirmala Gavit
Vasant Gite Politics: वसंत गीते म्हणतात, येत्या 20 नोव्हेंबरला नाशिक `ड्रग्ज मुक्त` होणार!

काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात लकी जाधव या कार्यकर्त्याला संधी दिली आहे. मात्र इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकमताने शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार निर्मला गावित यांना उमेदवारी देण्याचे शिफारस केली होती. असे असताना काँग्रेसच्या यादीत श्री. जाधव यांचे नाव आल्याने पक्षाचे स्थानिक पदाधिकारी संतप्त झाली. त्याच्या निषेधार्थ ६५ पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांच्याकडे राजीनामे दिले होते. त्यानंतर श्री. गुंजाळ यांसह ही सर्व यंत्रणा अपक्ष गावित यांच्यासाठी सक्रीय झाली.

Hiraman Khoskar & Nirmala Gavit
Supriya Sule Politics: पंकजा मुंडे यांच्याकडून सुप्रिया सुळे यांचे अनुकरण... काय आहे प्रकरण!

माजी आमदार गावित यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार गावित यांच्या प्रचारात सक्रिय भाग घेतला आहे. माजी आमदार गावित यांचे विविध पाड्यांवर थेट संपर्क आहे. आदिवासींसाठी उपसा सिंचन योजना आणि मतदार संघातील धरणांचे पाणी स्थानिकांना मिळून देण्यात त्यांची भूमिका होती. या कामाच्या आधारे अनेक मतदारांपर्यंत त्या पोहोचले आहेत.

काँग्रेसच्या उमेदवाराला प्रचार यंत्रणा उभी करण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. काँग्रेसचे उमेदवार जाधव यांच्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्र्यंबकेश्वर येथे सभा घेतली. या सभे नंतरही उमेदवार जाधव यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. अपक्ष गावित यांच्या प्रचारात सहभागी झालेले महाविकास आघाडीचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते यामुळे मतदार संघात वातावरण बदलले आहे.

माजी आमदार गावित यांच्या या प्रचारामुळे महायुतीचे उमेदवार आमदार खोसकर यांची डोकेदुखी वाढली आहे. आमदार खोसकर आणि माजी आमदार गावित या पारंपारिक प्रतिस्पर्धी आहेत. 2019 च्या निवडणुकीतही या दोघांमध्ये मुख्य लढत झाली होती. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराला आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी झटावे लागत आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com