महापालिका रस्ते कंत्राटदारांना पाठीशी घालते काय?

पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama

नाशिक : पाऊस संपल्यानंतर (Monsoon) तातडीने रस्त्यावर पडलेले खड्डे (Pits on roads) बुजविण्याचे आश्वासन देणाऱ्या महापालिका (NMC) आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Chandrakant pulkundwar) यांना पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. (Roads in the city are in very bad condition)

Dada Bhuse
Security: छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करा!

रस्त्यावरील खड्डे बुजवल्यास कारवाईचा इशारा दिला, तर महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिवाळीनिमित्त मजूर मिळत नसल्याचे कारण देत खड्डे बुजविण्यासंदर्भात चालढकल करत ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे.

Dada Bhuse
ठाकरेंनी स्वीकारले सत्तारांचे चॅलेंज; 7 नोव्हेंबरला सिल्लोडमध्ये तोफ धडाडणार...

मागील दोन वर्षात शहरातील रस्त्यांवर साडेसहाशे कोटी रुपये खर्च करूनही यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली. नाशिकचे रस्त्यांची चर्चा राज्य पातळीवर झाल्याने शासन पातळीवर दखल घेण्यात आले. नवनियुक्त पालकमंत्री दादा भुसे यांनी रस्त्यांच्या विषयावर महापालिकेला धारेवर धरत खड्ड्यांबाबत विचारणा केली होती. त्या वेळी पावसाळा संपल्यानंतर तातडीने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आयुक्तांनी आश्वासन दिले होते. मात्र, मागील पंधरा दिवसात पाऊस न झाल्याने या कालावधीत महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कारवाई झाली नाही.

रस्त्यांची परिस्थिती जैसे थे आहे. दिवाळी संपून आठ दिवस उलटत असतानाही महापालिका अजून दिवाळीच्या फीवरमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेलाच अल्टिमेटम दिला आहे. पंधरा दिवसात शहरातील रस्ते पूर्ववत न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.

बांधकाम विभागाकडून चालढकल

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेच्या बांधकाम विभागाचे आहे. आतापर्यंत नऊ हजार खड्डे बुजल्याचा दावा केला, मात्र हा दावा फुसका असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा संपल्यानंतर बांधकाम विभागाकडून किमान दोष निवारण कालावधीतील रस्त्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित होते, मात्र बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे. मजूर मिळत नसल्याने रस्त्यांवरील खड्डे मोजण्यात अडचण येत असल्याचे सांगितले जात असले तरी मात्र हा विषय ठेकेदारांचा आहे. महापालिकेचा नसतानादेखील ठेकेदारांची बाजू घेऊन चालढकल केली जात आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com