Nashik Shivsena news : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिकच्या बालेकिल्ल्याची डागडुजी करण्याबरोबरच नवीन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आता थेट रश्मी ठाकरे मैदानात उतरणार आहेत. विस्कटलेली संघटनात्मक घडी नीट करण्यासाठी त्या नाशिकच्या मैदानात उतरणार आहे. येत्या महिना अखेरीस त्या नाशिकचा दौरा करणार असुन महिला मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करतील.
नाशिकमध्ये (Nashik) शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) कामकाजात आलेली मरगळ दुर करण्यासाठी आता थेट मातोश्रीकडूनच नियोजन केले जात आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून सातत्याने शिवसेनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचा बंदोबस्त करण्याचे नियोजन शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी केले आहे.
या अनुषंगाने पक्षाच्या शालिमार (Nashik) कार्यालयात बैठक झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (NMC) तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पक्षबांधणी नव्या जोमाने सुरू झाली असून त्या पार्श्वभूमीवर सौ. ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी या वेळी सांगितले.
मेळाव्याच्या पूर्व तयारीच्या आढावा घेण्यास मध्य नाशिक विधानसभा परिसरातील पक्षाचे तसेच अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक या वेळी पार पडली.
गद्दारांना घाम फोडणारा मेळावा
रश्मी ठाकरे यांचा महिला मेळावा गद्दारांना घाम फोडणारा, न भूतो असाच होईल, असा विश्वास महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी या वेळी व्यक्त केला. पक्षातर्फे महिला आघाडीची जोरदार बांधणी झाली असून, आगामी निवडणुका जिंकून गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हा मेळावा महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्वास माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे यांनी व्यक्त केला.
बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, ॲड. यतीन वाघ, उपजिल्हा प्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, माजी नगरसेवक गोकूळ पिंगळे आदींसह मध्य नाशिक विधानसभा परिसरातील शिवसेना व अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे तर सूत्रसंचालन उपमहानरप्रमुख सचिन बांडे यांनी केले. (Latest Maharashtra News)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.