Adivasi Samaj Andolan : धनगर समाजाच्या एस.टी. संवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीवरून आदिवासी समाज आक्रमक; सरकारला दिला 'हा' इशारा

Dhangar Reservation : अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का लावू नये, आदिवासी समाजाचा सरकारला इशारा
Aadivasi Samaj Andolan
Aadivasi Samaj AndolanSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) मध्ये समावेश व्हावा, यासाठी नगर जिल्ह्यातील चौंडीसह राज्यभर धनगर समाज उपोषण-आंदोलन करत रस्त्यावर उतरला आहे. एकीकडे धनगर समाज तीव्र आंदोलन करत अनुसूचित जमातीमध्ये समावेशाची मागणी करत असताना आता आदिवासी समाजाने अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का लावू नये, असे सरकारला सुनावले आहे. अकोले (जि.नगर) येथे आदिवासी प्रकल्प कार्यालयावर आदिवासी विकास परिषदेत, आदिवासी एकता परिषद यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

आदिवासी समाजाच्या नेत्यांनी धनगर आरक्षणावरून जागरूक होत आम्ही वाघाचे बछडे आहोत, आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असा निर्णय सरकारने घ्यावा, असा इशारा दिला आहे. आंदोलनाची तीव्रता वाढवून आमचा न्याय हक्क प्राप्त करू, आमच्या हिताचे निर्णय झाले नाही तर प्रकल्प कार्यालय गलोहरी आणून बंद पाडू, आम्ही वाघाचे बछडे आहोत, असा इशारा आदिवासी विकास परिषदेचे नेते कैलास माळी यांनी दिला. प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांनी निवेदन स्वीकारून तातडीने शासनाला कळवतो, असे आश्वासन या वेळी दिले.

Aadivasi Samaj Andolan
Bachchu Kadu On BJP : मुख्यमंत्री शिंदेंना हटवल्यास परिणाम भोगावे लागतील; बच्चू कडूंचा भाजपला कडक इशारा

आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वाहरू सोनवणे यांनी राज्यातील धनगर व बंजारा समाजाला आदिवासी सवलती आरक्षण मिळावे म्हणून जोरदार आंदोलन व दबाव आणला जात आहे. मात्र, खरा आदिवासी समाज आज वंचित असून, आमच्या ताटातील अगोदर आम्हाला वाढा. मात्र, आमच्या ताटातील काढून दुसऱ्यांना देत असाल, तर मुळीच सहन करणार नाही, अन्यथा राज्य नव्हे देशभर आंदोलन होईल, याची सरकारने नोंद घ्यावी, असा इशारा दिला आहे.

भिल्ल विकास आराखडा मंजूर करा, नगर जिल्ह्यातील आदिवासींना दुधाळ जनावरे द्या, आदिवासी समाजाचा आर्थिक निधी इतरत्र वळवू नका, कसेल त्याची जमीन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करा, घरगुती वीज देऊन वीजबिल शासनाने भरावे, न्यूक्लियस बजेटमध्ये भरीव तरतूद करावी, शबरी मंडळाचे कर्ज माफ करावे, अशा १० मागण्यांचे निवेदन आदिवासी एकता परिषदेच्या वतीने वाहरू दादा सोनवणे, कैलास माळी, देविदास पवार, स्वप्निल धांडे यांनी राजूर आदिवासी विकास कार्यालयास दिले. या वेळी नाशिक, नगर, नंदुरबार, पुणे जिल्ह्यांतून भिल्ल समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited By- Ganesh Thombare

Aadivasi Samaj Andolan
Sarkarnama Podcast : छगन भुजबळांना गद्दारी भोवली ; बाळा नांदगावकरांनी दिवसा तारे दाखवले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com