Nilwande Water
Nilwande Water Sarkarnama

Nilwande Water : निळवंड्याच्या पाण्याला राजकारणाच्या उकळ्या; थोरात समर्थकांनी विरोधकांना सुनावले

Nagar News : निळवंडे धरणाचे पाणी निमगाव खुर्द येताच आमदार थोरात समर्थकांची गुलालाची उधळण

Nagar News : निळवंडे धरणातील पाणी निमगाव खुर्दमध्ये येताच काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी जल्लोष करत गुलाल उधळला. या वेळी माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे आणि ॲड. माधव कानवडे यांनी निळवंडे धरणाच्या कामाचे श्रेय घेणाऱ्या विरोधकांना चांगल्याच कोपरखळ्या लगावल्या. 'विकासकामांना ज्यांनी सातत्याने विरोध केला, त्यांनीच पाणी सोडण्याची औपचारिकता पूर्ण केली आणि तेच आता कामाचे श्रेय घेत आहेत', अशी टीका कानवडे यांनी केली. (Opposition took credit for Balasaheb Thorat's work: Madhav Kanwade)

संगमनेरमधील निमगाव खुर्द येथे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी आल्यानंतर त्याचे माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे यांच्या उपस्थित पूजन करण्यात आले. डाॅ. जयश्री थोरात, ॲड. माधव कानवडे, इंद्रजित थोरात आणि सरपंच संदीप गोपाळे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilwande Water
MLA Ganpat Gaikwad : आमदार गोळीबार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांनी यांनी दिला 'हा' आदेश

माजी आमदार तांबे म्हणाले, "निळवंडे धरण आणि त्याचे कालवे पूर्ण करण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी खूप मेहनत घेतली. राज्य सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यातून धरण आणि कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत.’’

महाविकास आघाडी सरकारच्या काळात निळवंडे धरण आणि कालव्यांच्या कामाला गती मिळाली. त्यातून काम पूर्ण होऊ शकले. आता पाणी सोडायचे बाकी आहे. परंतु आताचे सरकार यातदेखील दिरंगाई करत आहे, असे आमदार तांबे म्हणाले.

Nilwande Water
Solapur NCP : कर्नाटकचे माजी आमदार अजितदादांच्या गळाला; सोलापूरचे माजी नगरसेवकही राष्ट्रवादीत प्रवेश करणार

माधव कानवडे यांनी विरोधकांवर नाव न घेता चांगलेच तोंडसुख घेतले. 'भाजप महायुती सरकारच्या काळात विकास कामांची गती मंदावली आहे. काम केल्याची आवई उठवण्यात हे सरकार माहीर आहे. निळवंडे धरणाचे खरे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले, हे लहान मुलंदेखील सांगेल. पाणी सोडायची औपचारिकता पूर्ण करत आता या कामाचे श्रेय घेत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून जनता अशांपासून साधव आहे', असे माधव कानवडे यांनी म्हटले.

Nilwande Water
Ajitdada Solapur Tour : अजितदादांनी दिला भाजपच्या दोन देशमुखांच्या मतदारसंघातील मोठ्या नेत्यांना वेळ...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com