Ajit Pawar Solapur Tour
Ajit Pawar Solapur TourSarkarnama

Solapur NCP : कर्नाटकचे माजी आमदार अजितदादांच्या गळाला; सोलापूरचे माजी नगरसेवकही राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Ajit Pawar Solapur Tour : सोलापूर दौऱ्यात अजित पवार हे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनाही भेटणार आहेत. माने हे काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर गेले होते.

Solapur News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या (ता. ३ फेब्रुवारी) सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात अजितदादा हे शरद पवार गटाबरोबरच महाविकास आघाडीला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहेत. मूळचे सोलापूरचे पण कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह सोलापूरमधील काही माजी नगरसेवकही उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Former MLA Ravikant Patil will join Ajit Pawar's NCP)

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्ष बांधणीच्या कार्यक्रमासाठी प्रथमच सोलापुरात येत आहेत. आपल्या पहिल्याच दौऱ्यात पवार यांनी मोठे मासे गळाले लावले आहेत. त्यात सोलापूरचे मात्र कर्नाटकातील इंडी मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले माजी आमदार रविकांत पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar Solapur Tour
Boycott Election : फडणवीसांचे आश्वासन हवेत; मंगळवेढ्यातील 24 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

रविकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते सुधीर खरटमल यांच्यासह उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली हेाती. त्याचवेळी पाटील हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण, आपण सोलापूरच्या विकास कामांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यावेळी या दोघांनी सांगितले होते.

भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले पण सध्या शरद पवार गटात असलेले माजी नगरसेवक बिज्जू प्रधाने यांनी तर आपण अजितदादांसोबत जाणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. तीच भूमिका माजी नगरसेवक सुभाष डांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडली आहे. यासोबतच एमआयएमचे काही माजी नगरसेवकही उद्या अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय शरद पवार गटातील आणखी कोणते नेते दादांच्या गळाला लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

Ajit Pawar Solapur Tour
Ajitdada Solapur Tour : अजितदादांनी दिला भाजपच्या दोन देशमुखांच्या मतदारसंघातील मोठ्या नेत्यांना वेळ...

दरम्यान, सोलापूर दौऱ्यात अजित पवार हे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनाही भेटणार आहेत. माने हे काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर गेले होते. मात्र, त्याच मानेंना राखीव वेळ देत अजितदादांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. कारण माने हे भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत.

Ajit Pawar Solapur Tour
Mahavikas Aghadi Meeting : आंबेडकर महाआघाडीची बैठक सोडून बाहेर आले अन्‌ बॉम्बच टाकला...

सोलापूरच्या ग्रामीण भागात बळकट असलेल्या पक्षाला शहरातही बळकट करण्याच्या उद्देशाने अजित पवार यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुंबईत भेटणारे माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनाही अजितदादांनी राखीव वेळ दिला आहे. त्यामुळे चंदनशिवेंसारख्या जनतेतील नेत्याला आपल्या गोटात ओढून पवार यांनी विधानसभेचीही तयारी चालवल्याचे मानले जात आहे. आनंद चंदनशिवे हे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील महत्वाचे नेते आहेत.

Ajit Pawar Solapur Tour
BMC Budget 2024-25 : मुख्यमंत्र्यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला चहल यांचा 80 कोटींचा 'बूस्टर डोस'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com