Kopargaon News : मला जीवनात काही कमी नव्हतं. खूप छान आयुष्य होतं. पण, बापाच्या चेहऱ्यावर उदासी दिसली आणि एका क्षणात राजकारणात प्रवेश केला, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय एन्ट्रीबाबत भाष्य केले. (Pankaja Munde spoke for the first time about her entry into politics)
पंकजा मुंडे सध्या राज्यात शिवशक्ती परिक्रमा करत आहेत. आज नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे आल्यानंतर छोटेखानी सभेत बोलताना त्यांनी आपल्या राजकीय एन्ट्रीवर प्रथमच भाष्य केले. त्या म्हणाल्या की, सगळं वैभव होतं. चेहऱ्याला ऊन लागायचं नाही की पायाला माती लागायची नाही. मस्त ऐशोरामात राहत होते. पण बापाच्या चेहऱ्यावर दु:ख दिसलं. माझा मुलगा म्हणाला, ‘मम्मी, बाबा एकटे पडले आहेत, तू बाबांसाठी जा. मी शाळा करतो, मी क्लासला जातो. माझं मी स्वतःला सांभाळतो.' त्यानंतर मी घराच्या बाहेर पडले. तेव्हापासून आजपर्यंत घराच्या बाहेर आहे.
मुंडे साहेब एकटे पडल्याचे दिसल्यावर त्यांची लेक असूनही त्यांची माय झाले. गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर एवढ्या लोकांच्या ‘माये’च्या भूमिकेत मला जावं लागतं. मी मंत्री झाले, पाच वर्षे स्वतःचा चहा व पोहे खाऊ-पिऊ घालून लोकांना बोलावून ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून निधी दिला, असे पंकजा मुंडे यांनी नमूद केले.
मंत्री असताना भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याचा प्रयत्न केला. तरीही माझ्यावर आरोप झालेच. जनतेच्या विश्वासाच्या बळावर मी कधीच कुणासमोर झुकले नाही. धाडसाने लढले. मुंडेसाहेबांच्या वेळचं राजकारण वेगळं होतं. आताचं राजकारण वेगळं आहे. पुढची पिढी राजकारणात आली आहे. सकाळी कुणी कुठे, दुपारी कुठे, तरी संध्याकाळी कुठे हेच कळत नाही.पागल व्हायची वेळ आली. अशावेळी काय करावं; म्हणून दोन महिने सुटी घेण्याचा निर्णय घेतला. सुटी घेतल्याने काय बिघडलं बरं, असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.