Pathardi Child Marriage : पाथर्डीत अल्पवयीन विवाहाची 4 प्रकरणे समोर; पोलिसांकडून चौकशी सुरू

Four suspected child marriage cases surfaced during routine pregnancy checkups at Pathardi Sub District Hospital : पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयातील नियमित तपासणीदरम्यान प्रकरणे समोर; संबंधित महिलांची माहिती पोलिसांना देण्यात आली, विवाहाच्या वेळी वय किती होते याची पडताळणी सुरू
Pathardi Child Marriage
Pathardi Child Marriage Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar child marriage : अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह झाल्यानंतर गर्भवती राहिलेल्या चार मातांची माहिती पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयातील नियमित तपासणीत समोर आली आहे. या चारही प्रकरणांची माहिती आणि संबंधित महिलांची नावे उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने पोलिस प्रशासनाला दिली असून, या प्रकरणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दर शनिवारी गर्भवती मातांची नियमित तपासणी केली जाते. याच तपासणीदरम्यान चार महिलांचे विवाह अल्पवयात झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली.

यातील एका महिलेने (Woman) वैद्यकीय अधिकाऱ्यांना आधारकार्ड सादर केले. मात्र, तिच्या वयाबाबत संशय निर्माण झाल्यानंतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यात आधारकार्डमध्ये नमूद वय आणि वैद्यकीय तपासणीतून समोर आलेली माहिती यामध्ये विसंगती आढळल्याचे सांगण्यात आले.

दुसऱ्या एका प्रकरणात सध्या आधारकार्डनुसार संबंधित महिलेचे वय 18 वर्षे असल्याचे दिसत असले, तरी ती गर्भवती राहिली त्या वेळी तिचे वय 17 वर्षे असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा अहवालही उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने पोलिसांकडे (Police) पाठवला आहे.

Pathardi Child Marriage
Social Boycott Maharashtra : प्रेमविवाह केला म्हणून जातपंचायतीचा दंड अन् बहिष्काराचा आरोप; पोलिसांकडे तक्रार

या चारही प्रकरणांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. संबंधित विवाह नेमके कधी आणि कोणत्या परिस्थितीत झाले, तसेच त्यावेळी संबंधित मुलींचे वय किती होते, याची पडताळणी तपास यंत्रणेकडून केली जात आहे.

Pathardi Child Marriage
Beed Crime News : बीडमध्ये 'खाकीने' लाज आणली... PSI थेट घरात घुसला अन् एकट्या विवाहितेबरोबर नको-नको ते केले

बालविवाह प्रतिबंधक समित्यांच्या भूमिकेवर प्रश्न

तालुक्यात बालविवाह रोखण्यासाठी विविध गावांमध्ये समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, पाथर्डीतील या प्रकरणांमुळे या समित्यांच्या प्रत्यक्ष कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. बालविवाह रोखण्यासाठी असलेल्या यंत्रणांनी अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

दरम्यान, संबंधित बालविवाहांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. विवाह लावून देणारे नातेवाईक, संबंधित समित्यांचे सदस्य, फोटोग्राफर, मंगल कार्यालय चालक, मंडप व्यावसायिक आणि भटजी यांचीही चौकशी करून, दोष आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे. पोलिस तपासातून या प्रकरणांमागील संपूर्ण परिस्थिती आणि बालविवाह प्रतिबंधक यंत्रणेची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com