Rape Accused Escape : अत्याचारातील संशयिताला पोलिस ठाण्यात आणला, चप्पल हातात घातली अन् पसार झाला; 'पोलिसांचीच मदत' नातेवाईकांना संशय

Rape suspect allegedly escapes from Pathardi Police Station; CCTV probe ordered : पाथर्डी पोलिस ठाण्यातील घटनेने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी सुरू, दोषी आढळल्यास विभागीय कारवाईचा इशारा
Rape Accused Escape
Rape Accused EscapeSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात नोंद झालेल्या अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी पोलिस ठाण्यातून पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याने आरोपीला मदत केल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला असून, संपूर्ण घटनेची सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 16 जुलै रोजी अत्याचार (Crime) प्रकरणातील संशयित गणेश बाळासाहेब म्हस्के याला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना पाथर्डी पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याला पोलिस ठाण्यातील एका खोलीत बसविण्यात आले होते.

या प्रकरणात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करू नये, यासाठी एका राजकीय पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्याकडून स्थानिक पोलिसांवर (Police) दबाव आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र, पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी संशयिताला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

Rape Accused Escape
Pathardi Gangrape Case : पाथर्डीत गँगरेप, पीडितेचं थेट पोलिस ठाण्यासमोर टोकाचं पाऊल; गोंधळात साथीदाराचा मृत्यू, 16 जणांवर अखेर गुन्हा

दरम्यान, संबंधित खोलीत एक पोलिस कर्मचारी गेल्यानंतर संशयितासोबत गृहरक्षक दलाचा जवान तैनात करण्यात आला होता. काही वेळाने जवान खोलीबाहेर पडताच संशयिताने तेथून पलायन केल्याचा दावा करण्यात आला आहे. आरोपीने पळून जाण्यासाठी हातात चपला घेतल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

Rape Accused Escape
BJP Vivek Kolhe : जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे आक्रमक; गणेश कारखान्याच्या 38 कोटींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

पोलिसांवरच गंभीर आरोप

संशयित फरार झाल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी संबंधित कर्मचाऱ्याला संशयिताला तातडीने हजर करण्याचे तोंडी निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. याचवेळी, पीडितेच्या नातेवाईकांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. फिर्याद मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

चौकशी सुरू

या संदर्भात पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितले की, "संशयित आरोपीला पळून जाण्यास कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याने मदत केली असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधिताविरुद्ध विभागीय कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल." सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com