Jayant Patil & Devendra Fadanvis
Jayant Patil & Devendra FadanvisSarkarnama

घरबसल्या ट्वीट करणारे रडीचा डाव खेळतात!

जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता टीका
Published on

जळगाव : शेतकरी (Farmers) तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्‍नावर शेतकरी दिंडी काढून शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्रभर (Maharashtra) जनसंपर्क करीत असतात, परंतु काही जण घरबसल्याच दहा, पंधरा ट्वीट करून रडीचा डाव खेळतात, असा टोला राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.

Jayant Patil & Devendra Fadanvis
नीलिमा पवार यांनी `मविप्र` संस्‍थेला उच्च पातळीवर नेले!

चांदसर (ता. धरणगाव) येथे माजी आमदार मु. ग. पवार यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

Jayant Patil & Devendra Fadanvis
अमित शहा यांनीच मशिदींवरील भोंगे उतरवण्यात हस्तक्षेप करावा!

जयंत पाटील म्हणाले, की आमदार मु. ग. पवार यांनी आयुष्यभर शरद पवार यांना साथ दिली, ते जनतेच्या प्रश्‍नासाठी समरस होते. त्यांनी प्रत्येक लढ्यात शरद पवार यांची सोबत केली. शरद पवार यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत संघर्ष केला, जळगाव ते नागपूर पायी शेतकरी दिंडी काढली तसेच ते महाराष्ट्रभर जनतेशी संपर्क करीत असतात. गेल्या दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबाबत चौदा ट्वीट करून टीका केली होती. त्यावर पाटील यांनी नाव न घेता प्रत्यूत्तर दिले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com