PM Modi Nashik Visit: मोदींनी भुजबळांना चुचकारले; म्हणाले, 'सबसे जवान तो आप हो'

Chhagan Bhujbal News: नरेंद्र मोदी यांनी भुजबळांसोबत केला हास्यविनोद
PM Modi Nashik Visit
PM Modi Nashik VisitSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: "सबसे जवान तो आप हो!" असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी भुजबळांसोबत हास्यविनोद केल्याने उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला. मंत्री भुजबळ राज्यातील मराठा आरक्षणाला विरोध केल्याने सध्या चर्चेचा विषय आहेत. पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांना नक्की काय संदेश द्यायचा असेल याची उत्सुकता आहे.

राज्यातील मराठा -ओबीसी आरक्षण लढ्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचे मेळावे भुजबळ घेत आहेत. त्यामुळे वेगळ्याच राजकीय गुंता निर्माण झाला आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच की काय पंतप्रधानांनी भुजबळांना चुचकारले तर नाही ना? मागील काही वर्षापूर्वी देखील एका कार्यक्रमात देखील बुद्धिबल और भुजबल का मेल जमाव..! असे वक्तव्य केले होते. मात्र त्यावेळी शरद पवारांच्या प्रेमापोटी भुजबळ यांनी निष्ठा कायम ठेवल्या होत्या.

PM Modi Nashik Visit
Ajit Pawar : बारामतीवरून अजित पवारांचा काकांना खडा सवाल; म्हणाले, 'बारामतीचा विकास कुणी...'

ओबीसींचे देशातील महत्व लक्षात घेता ज्येष्ठ नेते म्हणून भुजबळांच्या भूमिकेकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागून आहे. दोन दिवसांपूर्वी झालेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पूर्णतः राजकीय दौरा होता.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून त्याकडे पाहिले जात होते. नाशिकमध्ये मोदी यांनी प्रामुख्याने आगामी २२ जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या प्रचारावर भर दिला होता. तर मुंबईतील दौऱ्यात प्रामुख्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला लक्ष केले होते. या दृष्टीने नाशिकच्या दौऱ्यातील पंतप्रधान मोदी यांची सर्व वक्तव्य पाहिली जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com