Chhagan Bhujbal News : जिल्हा बँकेला हवेत भुजबळांकडील 51 कोटी; काय आहे प्रकरण?

Nashik Political News : 12 कोटी 12 लाख थकीत, मुद्दल व व्याज 39 कोटी 54 लाख असे एकूण 51 कोटी 66 लाख रुपये थकवले...
Chhagan Bhujbal News :
Chhagan Bhujbal News :Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : आर्थिक गर्तेत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बड्या थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यात भुजबळ कुटुंबीयांचाही समावेश आहे. त्यांच्या मालकीच्या दाभाडी येथील आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड कंपनीकडील 51 कोटी 66 लाख रुपयांची थकबाकी असून, ती वसूल करण्यासाठी बँकेकडून हालचाली सुरू केल्या आहेत. बँकेच्या या वसुली मोहिमेला भुजबळ कसे सहकार्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

बँक अधिकाऱ्यांनी कारखानास्थळावर मागणी नोटीस चिकटवली, तर कारखान्याचे संचालक असलेल्या भुजबळबंधूंनादेखील नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड (गिसाका) या साखर कारखान्यासाठी भुजबळांनी जिल्हा बँकेकडे 10 नोव्हेंबर 2011 रोजी 30 कोटी रुपयांची कर्ज मागणी केली होती. बँकेने 3 जानेवारी 2012 रोजी कर्ज मंजूर केले. या कारखान्याने 30 कोटींपैकी 18 कोटींची नियमितपणे कर्जाची परतफेड केली. परंतु 2013 पासून कारखान्याकडे 12 कोटी 12 लाख थकीत मुद्दल व व्याज 39 कोटी 54 लाख असे एकूण 51 कोटी 66 लाख रुपये थकीत आहेत.

समीर आणि पंकज भुजबळांना नोटीस -

आर्मस्ट्राँगकडील थकीत रक्कम वसुलीसाठी जिल्हा बँकेचे अधिकारी गोपीचंद निकम, गोरख जाधव यांच्यासह केंद्र कार्यालयाकडील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सरफेशी कायद्यांतर्गत कारखान्याच्या साइटवर जाऊन मागणी नोटीस चिकटवली, तर कारखान्याचे संचालक असलेले पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह सत्येन आप्पा केसरकर यांनाही नोटीस बजावण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे बँकेने थकबाकी वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बँकेने वसुली कारवाई तीव्र करण्याची गरज -

जिल्हा बँकेशी संबंधित सर्वच बड्या राजकीय व्यक्तींकडे मोठी थकबाकी आहे. या थकबाकीमुळे बँक आर्थिक गर्तेत सापडली असून, बँकेचा परवाना रद्द होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा बँकेला वाचविण्यासाठी सर्वच बड्या थकबाकीदारांकडून कडक वसुली प्रक्रिया राबवून बँक वाचविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com