नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज मालेगाव दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांचे नाशिकला (Nashik) आगमन झाले. मात्र शिवसेना (Shivsena) नेत्यांवर झालेल्या सराईत हल्ल्यांत शिंदे गटाचा सहभाग असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्याबाबत कारवाईसाठी शिंदे यांच्या दौऱ्याच्या दिवशीच मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरातील कार्यकर्त्यांना नोटीस (Issue notices) बजावल्या आहेत. (Police have a fear of Shivsena`s Agitaion in CM Nashik, Malegaon visit)
पंचवटीतील आडगाव हद्दीतील शिवसेना पदाधिकारी सुनील जाधव व राहुल दराडे यांना आडगाव पोलिसांनी १४९ नोटिसा बजावल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर येण्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील शिवसैनिकांना पोलिसांनी नोटीस बजावल्याची चर्चा सुरू आहे. शहरातील राजकीय वातावरणावर परिणाम होऊ नये आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नाशिक पोलिसांकडून शहरातील शिवसैनिकांना १४९ प्रमाणे नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या नाशिक दौऱ्या दरम्यान मोर्चा वगेरे काढू नये, यासाठी शहरात मनाई आदेश लागू करण्यात आले. शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न शहरात निर्माण होऊ नये यासाठी आडगाव पोलिसांकडून शिवसेनेचे पदाधिकारी सुनील जाधव व राहुल दराडे यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
नाशिक शहरात २०१७ साली भाजपचा मेळावा उधळला गेला होता. त्या वेळी पंचवटी आडगाव पोलिस ठाणे हद्दीतील सुनील जाधव व राहुल दराडे हे अग्रेसर होते. त्या पार्श्वभूमीवर नोटिसा दिल्याचे समजते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.