Prakash Ambedkar : 'इंडिया'सोबत वाटाघाटी, तरी वंचितची स्वबळाची तयारी; आंबेडकरांच्या मनात काय सुरू?

Vanchit Aghadi News : आंबेडकरांच्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत गोंधळाची स्थिती
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : दोन महिन्यांत लोकसभेचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. असे असतानाही इंडिया आघाडीच्या निर्णयाची वाट न पाहता वंचितने आपल्या कार्यकर्त्यांना लोकसभेची तयारी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एकीकडे वाटाघाटी सुरू असतानाही दुसरीकडे वंचितने स्वबळाचा नारा दिल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाने जोरात सुरू केली आहे. त्या दृष्टीने आज वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit) नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काय धोरण स्वीकारावे, यांसह स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. गत निवडणुकीत वंचितने नाशिक मतदारसंघात दिलेल्या उमेदवाराला लक्षणीय मते मिळाली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही निर्णयाची वाट न पाहता स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या आहेत.

Prakash Ambedkar
Pune BJP : धंगेकरांचा पराभव निश्चित; कसब्याचे उट्टे काढण्यास भाजप तयार...

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाड्यांमध्ये उमेदवारांची चर्चा सुरू आहे. दोन्ही आघाड्यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केलेली आहे. याबाबत उमेदवारांची चाचणीदेखील करण्यात येत आहे. मात्र, असे असतानाच दोन्ही आघाड्यांतील घटक पक्षांनीही नाशिक मतदारसंघावर दावा करून आघाड्यांची अडचण केली आहे. त्यात ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीचीही आता भर पडली आहे.

Prakash Ambedkar
Bachchu Kadu : मनोज जरांगेंसाठी बच्चू कडू भुजबळांशी भिडले..!

नाशिक दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. या वेळी निवडणुकीच्या रणनीतीबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी स्वबळावर निवडणुकीची तयारी ठेवावी, अशा सूचना बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी केल्या. जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्याला विविध प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीतील निर्णयामुळे नाशिक मतदारसंघात नेमका उमेदवार कोणाचा, यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंडिया आघाडीचा घटक पक्ष शिवसेनेची वंचित बहुजन आघाडीशी चर्चा झाली आहे. आघाडीचे नेते ॲड. आंबेडकर यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बैठक झाली आहे. 'इंडिया'कडून आंबेडकर यांना सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. असे असतानाच नाशिकमध्ये स्वतंत्र बैठक घेऊन स्वबळावर निवडणुकीची चाचपणी करण्यात येऊन बूथ रचना पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. परिणामी इंडिया आघाडीमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Prakash Ambedkar
Shashikant Shinde : कोरेगाव मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करा, अन्यथा...; शशिकांत शिंदेंचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com