Kumbh Mela Politics: 130 कोटी कुठे गेले? प्रकाशा कुंभमेळ्यावरून भाजप-शिवसेना नेते आमनेसामने

Prakasha Kumbh Mela fund news: नंदुरबारच्या प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंजूर 130 कोटी रुपयांच्या निधीवरून भाजप आणि शिंदे गटात पुन्हा संघर्ष पेटला आहे. चंद्रकांत रघुवंशी, हीना गावित आणि विजयकुमार गावित यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली.
Chandrakant Raghuvanshi, Heena Gavit
Chandrakant Raghuvanshi, Heena GavitSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

Nandurbar News: नंदुरबार जवळील प्रकाशा (Prakasha) येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 130 कोटी रुपयांच्या निधीवरून महायुतीतच नव्या वादाला तोंड फुटलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री निधी मंजूर झाल्याचे दावे होत असताना, दुसरीकडे “तीन रुपयेही प्रत्यक्षात आले नाहीत” असा आरोप करत शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघूवंशी (Chandrakant Raghuvanshi) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

“गावकरी सांगतील ती कामं व्हायला हवीत; ठेकेदार सांगतील ती नव्हे,” असा टोला लगावत चंद्रकांत रघूवंशी यांनी विकासकामांच्या नावाखाली ‘ठेकेदारराज’ सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. कुंभमेळ्याचा निधी हा कोणाच्या मतदारसंघाचा नसून जनतेच्या सुविधांसाठी असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप नेत्यांवर टीकेची झोड उठवली.

Chandrakant Raghuvanshi, Heena Gavit
Pimpri Chinchwad News: पिंपरीत आजी-माजी लोकप्रतिनिधींची सुरक्षा भारी; लाखोंची थकबाकी मात्र सरकारी दरबारी!

दुसरीकडे भाजपच्या माजी खासदार हीना गावित (Heena Gavit) यांनी लगेचच पलटवार करीत “मुख्यमंत्र्यांनी 130 कोटींचा निधी मंजूर केला आहे. काही जण फक्त श्रेयासाठी राजकारण करत आहेत,” असा चिमटा काढला. जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या असून गावकरी सांगतील तीच कामं होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Chandrakant Raghuvanshi, Heena Gavit
5 देश, 1 मिशन! PM मोदींच्या दौऱ्याचे मोठे फायदे : जगभरात मोदींची डिप्लोमसी

दरम्यान, आमदार विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विकास आराखडा तयार केला होता. हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला असून त्यालाच मंजुरी मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील धार्मिक सोहळ्याच्या तयारीपेक्षा सध्या श्रेयवाद आणि आरोपांच्या राजकारणालाच जास्त उधाण आल्याचं चित्र आहे. विकासकामं प्रत्यक्षात कधी सुरू होणार आणि 130 कोटींचा निधी नेमका कुठे पोहोचला, याकडे आता प्रकाशासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com