Vasant More Resign MNS : ‘लोकांची पसंत मोरे वसंत, मनसेला नव्हती पसंत’ : रूपाली ठोंबरेंकडून मोरेंच्या निर्णयाचे स्वागत

Rupali Thombare welcomed More's decision : मनसेचे नेते, नगरसेवक आमचे वसंतभाऊ यांनी नुकताच पक्षाचा राजीनामा दिल्याचे कळले. वसंतभाऊंचे पहिल्यांदा मी मनापासून अभिनंदन करते. कारण, त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. कारण संघटनेत, पक्षात लोकहितासाठी हातोडा घेऊन जाणारा नेता काम करत असताना त्यांची होणारी कुचंबणा, त्यांच्या कामात आणण्यात येणारे अडथळे या सर्व गोष्टी वसंत मोरे यांनी अनेक वर्षे सहन केल्या आहेत.
Vasant More-Rupali Patil Thombare
Vasant More-Rupali Patil Thombare Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्याचे वेगवेगळे पडसाद उमटत आहेत. मोरे यांच्या एकेकाळच्या मनसे पक्षातील सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी वसंत मोरे यांच्या मनसे सोडण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘लोकांची पसंत मोरे वसंत, मनसेला नव्हती पसंत’ असे सांगत त्यांनी वसंत मोरे यांनी आज दिलेला राजीनामा अत्यंत योग्य आहे, असे म्हटले आहे.

रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare ) म्हणाल्या, मनसेचे नेते, नगरसेवक आमचे वसंतभाऊ (Vasant More) यांनी नुकताच पक्षाचा राजीनामा दिल्याचे कळले. वसंतभाऊंचे पहिल्यांदा मी मनापासून अभिनंदन करते. कारण, त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. कारण संघटनेत, पक्षात लोकहितासाठी हातोडा घेऊन जाणारा नेता काम करत असताना त्यांची होणारी कुचंबणा, त्यांच्या कामात आणण्यात येणारे अडथळे या सर्व गोष्टी वसंत मोरे यांनी अनेक वर्षे सहन केल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vasant More-Rupali Patil Thombare
Kolhapur Police : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे...आंदोलक घुसले कलेक्टर कचेरीत; पोलिसांचा गुप्तचर विभाग कुठंय?

उलट मी म्हणेन की वसंत मोरे यांना हा निर्णय घेण्यासाठी उशीर झाला आहे. पण, ‘लोकांची पसंत मोरे वसंत, मनसेला नव्हती पसंत’ असे म्हणत वसंत मोरे यांनी आज दिलेला राजीनामा अत्यंत योग्य आहे, असे ठोंबरे यांन नमूद केले आहे.

रूपाली पाटील म्हणाल्या, वसंत मोरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागतच असेल. पण, निर्णय शेवटी तुम्हाला घ्यायचा आहे. कारण काम करणाऱ्या नेत्याला, पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला काम करताना मान आणि सन्मान मिळतो. त्या संघटनेत अथवा पक्षात तो प्रवेश करत असतो. तुमच्या भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमची लढाई तुमच्या पद्धतीनेच चालू ठेवावी, एवढेच सांगते.

राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात मोरेंनी काय म्हटले आहे?

वसंत मोरे यांनी पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांना हे राजीनामा पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले, मनसेच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे. पक्षवाढीसाठी गेली 18 वर्षे सातत्याने पुणे शहरात आणि राज्यात सरचिटणीस म्हणून कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे.

Vasant More-Rupali Patil Thombare
Sanjay Raut on Vasant More: वसंत मोरेंनी 'वॉशिंग मशीन'च्या दिशेने जाऊ नये; राऊतांचा सल्ला

भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत, यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून 'कोंडी' करण्याचे 'तंत्र' अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा, ही नम्र विनंती, असेही त्यांनी नमूद केले आहे.

R

Vasant More-Rupali Patil Thombare
Harshvardhan Patil News : ‘हर्षवर्धन पाटील हे स्वतःहून भाजपमध्ये गेले नाहीत'; सुशीलकुमार शिंदेंना काय नेमकं सांगायचंय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com