Shivaji Kardile : ''ADCC'ची चौकशी, दोष सिद्ध व्हायचेय'; शिवाजी कर्डिले म्हणाले, 'तोपर्यंत गुन्हेगार...'

Ahmednagar District Co-operative Bank Annual General Meeting : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी गुन्हेगार ठरवू नका, असं आवाहन केलं.
Shivaji Kardile
Shivaji KardileSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले राहुरी विधानसभा मतदारसंघातून चाचपणी करत आहेत. तशी तयारी देखील केली आहे.

जिल्हा बँकेच्या कारभाराविषयी शरद पवार यांनी उपस्थित केलेली शंका, नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांकडून सुरू असलेली चौकशी, नोकर भरतीमध्ये आरक्षण न ठेवल्यानं 'ADCC' बँकेचा कारभारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. यावर शिवाजी कर्डिले यांनी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठ भाष्य केलं आहे.

शिवाजी कर्डिले म्हणाले, "जिल्हा बँकेच्या (Bank) चौकशीमध्ये 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' होणारच आहे. जे कोणी या चौकशीमध्ये दोषी आढळतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. पण दोष सिद्ध होण्याआधी आम्हाला कुणी गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न करू नये".

Shivaji Kardile
Jayant Patil : आमदार जगतापांना विखेंसारख्या पराभवाची भीती; जयंत पाटील म्हणाले, 'सत्तेत येताच, त्यांना नवा विषय...'

दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

नोकर भरती व कारखान्यांना केलेले कर्जवाटप योग्यच असल्याचा दावा भाजपचे (BJP) माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी केला. जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. जिल्हा बँकेच्या चौकशीबाबत बातम्या येत आहेत. या चौकशीअंतर्गत 19 मुद्यांची बँकेने सहकार खात्याला माहिती दिली आहे. या चौकशीमध्ये 'दूध का दूध आणि पाणी का पाणी', होणारच आहे. जे कोणी या चौकशीमध्ये दोषी आढळतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. पण दोष सिद्ध होण्यापूर्वीच आम्हाला कुणी गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Shivaji Kardile
Sanjay Raut News: शिवसेना ठाकरे गटाचा दावा, नाशिक मध्य मतदार संघात काँग्रेसची केली कोंडी?

प्रतापराव ढाकणेंना नोटीस पाठवणार

केदारेश्वर कारखान्याचे अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांनीही बँकेवर आरोप केले. मात्र, त्यांचा कारखाना 'एनपीए'मध्ये गेलेला आहे. म्हणून त्या कारखान्याला कर्जवाटप करता येत नाही. तरीही त्यांनी बँकेकडे कर्जाची मागणी केली होती. त्यांना कर्ज नाकारले म्हणून त्यांनी बँकेवर आरोप केलेत. कायदेशीर सल्ला घेऊन त्यांना बँक नोटीस पाठवील, असेही शिवाजी कर्डिलेंनी सांगितले.

नोकर भरती नियमानुसारच होणार

बँकेने सुरू केलेली 696 जागांवरील नोकर भरती नियमानुसारच आहे. राज्य शासनाने दहा कंपन्या नेमलेल्या आहेत. या दहाही कंपन्यांना बँकेने पत्र व्यवहार केला होता. परंतु यातील फक्त दोनच कंपन्या बँकेकडे आल्या. त्यांच्याशी वाटाघाटी करून ठराव केला. तरीही या कंपनीबाबतही उलट-सुलट बातम्या आल्या. कंपनीचा अनुभव न पाहता काम दिलेले नाही. या कंपनीला अनुभव असल्याचे पाहूनच काम दिल्याचा दावा शिवाजी कर्डिले यांनी केला.

जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे , संचालक प्रशांत गायकवाड, गणपत सांगळे, करण ससाणे, चंद्रशेखर घुले, सीताराम पाटील गायकर, गीतांजली शेळके, आणासाहेब म्हस्के, भानुदास मुरकुटे, अनुराधा नागवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे उपस्थित होते. यावेळी 31 कोटीचा धनादेश मृत कर्मचारी वारसांना देण्यात आला, तर शाखा अधिकारी मनीषा आहेरे यांना 50 लाखांच्या मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com