प्रदीप पेंढारे
Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर राजकीय संघर्ष पेटला होता. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करत होते. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके (अजित पवार गट) यांनी नगर दक्षिणमधील दुष्काळावरून रान पेटवले होते. भाजप आमदार मोनिका राजळे यांनी देखील दुष्काळामुळे उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. भाजपचे (BJP) युवा नेते विवेक कोल्हे यांनीही पालकमंत्री राधाकृष्ण विखेंवर जोरदार टीकास्र सोडले होते. राधाकृष्ण विखेंनाच (Radhakrishna Vikhe Patil) दुष्काळाच्या मुद्यावरून विरोधकांसह भाजप कार्यकर्त्यांनी टार्गेट केले होते. त्यामुळे विखेंनी नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 96 गावांचा दुष्काळी यादीत समावेश केल्याची घोषणा केली आहे. या गावांमध्ये आता दुष्काळात राबविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजनाचा लाभ मिळणार आहे.
मंत्रालयातील वॉर रुममध्ये मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. उर्वरित गावांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले. या बैठकीस मदत व पूर्नवसन मंत्री अनिल पाटील, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, फलोत्पादन व रोजगार हमी विभागाचे मंत्री संदिपान भुमरे, मदत व पुर्नवसन विभागाचे अतिरिक्त सचिव सोनिया शेट्टी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, कृषी विभागाचे सचिव सुनिल चव्हाण उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र, जिल्हा आणि तालुक्यातील पर्जन्यमानाची टक्केवारी 75 पेक्षा कमी आणि 750 मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला हा निकष लक्षात घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 96 गावांचा समावेश दुष्काळी गावांच्या यादीत करण्यात आला आहे. दुष्काळ राबविण्यात येणाऱ्या शासकीय उपाययोजनांसह या गावांमध्ये पाण्याचे टॅंकर सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 96 महसूल मंडळांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला आहे. यात नालेगांव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिंचोडी पाटील, वाळकी, चास, रुईछत्तीशी, विरगाव, समशेरपूर, साक्रीवाडी, राजुर, शेंडी, कोतूळ, ब्राम्हणवाडा, अकोले, जामखेड, अरणगाव, खर्डा, नान्नज, नायगाव, कर्जत, राशीन, भांबोरा, कंबोळी, मिरजगाव, माही, कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहिगाव बोलका, पोहेगाव, नेसावा खुर्द, नेवासा बुद्रूक, सतलबपुर, कुकाणा, चांदा, घोडेगाव, सोनई, वडाळा बहिरोबा, पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हान, वडझिरे, निघोज, टाकळी ढोकेश्वर, पळशी, पाथर्डी, माणिकदौंडी.
टाकळी मानूर, करंजी, मिरी, राहाता, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा, शिर्डी, राहुरी बुद्रूक, सात्रळ, ताहाराबाद, देवळाली प्रवरा, टाकळीमियॉ, ब्रॉम्हणी, वांबोरी, संगमनेर बुद्रूक, धांदरफळ बुद्रूक, आश्वी बुद्रूक, शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळासणे, साकुर, पिंपरणे, शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एंरडगाव, श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेनगाव, चिंबळा, देवदैठन, कोळेगाव, श्रीरामपूर, बेलापूर बुद्रूक, उंदिरगाव, टाकळीभान गावांचा समावेश आहे.
मुरघास निर्मितीसाठी 30 कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. राज्यात पशुधनाच्या चाऱ्याकरता एक लाख लाभार्थी शेतकऱ्यांना पाच लाख टन मुरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या 30 कोटी रुपये खर्चासाही मान्यता मिळाली आहे. पशुपालकांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याची माहिती विखे यांनी दिली.
एकही तालुका दुष्काळी कसा नाही ? आमदार लंकेचा सवाल
राष्ट्रवादीचे आमदार लंके (Nilesh Lanke) नगर दक्षिणमधील दुष्काळी परिस्थितीवरून दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होत चालले आहेत. मुख्यमंत्री यांना पत्र लिहिल्यानंतर नगर जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेटी घेऊन निवेदन दिले. यानंतर आमदार लंके हे थांबले नाही, तर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेतली. नगर जिल्ह्यात एकही तालुका दुष्काळी कसा नाही ? असा सवालही मंत्री पाटील यांना आमदार लंके यांनी केला आहे. मंत्री पाटील यांची भेट घेत आमदार लंके यांनी नगर जिल्ह्यातील विशेष करून नगर दक्षिण भागातील दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.