Chhagan Bhujbal News: भुजबळ समर्थक खैरे महायुतीचा खेळ बिघडवणार?

Nashik Lok Sabha 2024 : नाशिक मतदार संघाबाबत भारतीय जनता पक्षाने विशेष लक्ष घातले आहे. या संदर्भात काल दिवसभर विविध नेत्यांनी मंत्री भुजबळ यांच्याशी चर्चा केली. श्री भुजबळ यांना स्वतः किंवा आपल्या कुटुंबीयांपैकी उमेदवारी हवी होती, हे लपून राहिलेले नाही. त्यांच्या या आकांक्षावर पाणी फिरले आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा विविध नेत्यांनी प्रयत्न केले आहेत
Chhagan Bhujbal, Devendra Fadanvis, Dilip Khaire
Chhagan Bhujbal, Devendra Fadanvis, Dilip Khairesarkarnama
Published on
Updated on

Nashik Constituency 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र महायुतीतील अन्य इच्छुक आणि घटक पक्ष काय भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

त्यामुळे महायुतीतील एकोपा निर्माण करण्यासाठी फोन आघाडी घेणार हे महत्त्वाचे आहे. उद्या (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोण कोण उमेदवारी अर्ज दाखल करतात याकडे उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागून आहे.

नाशिक मतदारसंघातून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक दिलीप खैरे उद्या आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. श्री खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास समता परिषदेची यंत्रणा त्यांच्यासाठी सक्रिय होईल.

समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहातूनच श्री. खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी दाखविली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास महायुतीला त्याचा फटका बसू शकतो हे स्पष्ट आहे.

महायुतीच्या जागावाटप आणि उमेदवारी यामध्ये तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी विशेष रस दाखविला होता. भारतीय जनता पक्षाला BJP नाशिक मतदार संघ हवा होता. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटालाही नाशिक मतदारसंघातून मंत्री भुजबळ यांना उमेदवारी देण्याची इच्छा होती.

या वादातच तिन्ही पक्षांमध्ये कालापव्य झाला. त्यातून मोठा विलंब झाला आहे. अशा स्थितीत महायुतीचे उमेदवार खासदार गोडसे यांना प्रचारामध्ये आघाडी घेण्यासाठी आणखी काही काळ जाण्याची शक्यता आहे. त्यात त्यांना बंडखोरीला सामोरे जावे लागल्यास अडचणी वाढू शकतात.

Chhagan Bhujbal, Devendra Fadanvis, Dilip Khaire
Nashik Lok Sabha Election 2024 : गोडसे म्हणतात, "कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढणार"

नाशिक मतदार संघाबाबत भारतीय जनता पक्षाने विशेष लक्ष घातले आहे. या संदर्भात काल दिवसभर विविध नेत्यांनी मंत्री भुजबळ यांच्याशी चर्चा केली. श्री भुजबळ यांना स्वतः किंवा आपल्या कुटुंबीयांपैकी उमेदवारी हवी होती, हे लपून राहिलेले नाही. त्यांच्या या आकांक्षावर पाणी फिरले आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा विविध नेत्यांनी प्रयत्न केले आहेत.

श्री. भुजबळ यांना नाशिक मतदार संघातून स्व पक्षाला जागा न मिळाल्यास सहकारी पक्षाकडून आपल्या पसंतीचा उमेदवार देण्याची इच्छा होती. याबाबत त्यांनी शेवटच्या क्षणी प्रयत्न देखील केले होते.

माजी आमदार माणिकराव कोकाटे यांसह काही नेते शेवटच्या टप्प्यात चाचपणी करीत होते. मात्र विद्यमान खासदार असल्याने हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली आहे. आता इच्छुक असलेले आणि उमेदवारी न मिळालेले काही नेते अद्यापही आपले महत्त्व टिकावे म्हणून राजकीय डावपेच आखत आहेत.

Chhagan Bhujbal, Devendra Fadanvis, Dilip Khaire
Nashik Lok Sabha Election : मोठी बातमी : नाशिकमधून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर

या डावपेचाचा भाग म्हणूनच श्री. खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास त्यांची मनधरणी उमेदवार गोडसे आणि शिंदे गटाच्या नेत्यांना करावी लागणार आहे. भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी आपली विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. ते एक प्रबळ उमेदवार होते. उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal, Devendra Fadanvis, Dilip Khaire
Chhagan Bhujbal News : पंतप्रधानांबद्दल 'ते' वक्तव्य केल्यानं भुजबळांनी जरांगेंचा घेतला समाचार; म्हणाले, "अक्कल अन्..."

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून ते पुढील भूमिका ठरवणार आहेत. याशिवाय आणखी कोण पुढे येतो का? याचीही उत्सुकता आहे. त्यामुळे महायुतीपुढे बंडखोरी शमविने हे एक महत्त्वाचे काम असेल. त्यात भुजबळ यांच्या समर्थकांनी उमेदवारी केल्यास महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

Edited By : Umesh Bambare

Chhagan Bhujbal, Devendra Fadanvis, Dilip Khaire
Rohit Pawar On Ajit Pawar : आईची योग्यता काढणाऱ्या अजितदादांना रोहित पवारांनी दिलं सडेतोड उत्तर !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com