Wife Harassment Case : सात जन्मांच्या गाठीला 10 दिवसांत पूर्णविराम; पत्नीच्या जाचाला कंटाळून युवकानं उचललं टोकाचं पाऊल

Shrirampur police registered case against wife and five others after alleged mental harassment through affair photos and videos led Rahul Kharat death : पत्नीचे असलेले प्रेमसंबंध आणि तिच्याकडून मिळालेल्या धमक्यांमुळे युवक पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राहाता इथं घडली आहे.
Shrirampur Crime
Shrirampur CrimeSarkarnama
Published on
Updated on

Shrirampur crime news : लग्नाचे विधी पार पडून जेमतेम दहा दिवस झाले असतानाच, पत्नीचे असलेले प्रेमसंबंध आणि तिच्याकडून मिळालेल्या धमक्यांमुळे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चितळी (ता. राहाता) इथं घडली आहे.

राहुल भाऊसाहेब खरात (वय 27) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मयताचे वडील भाऊसाहेब खरात यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी पत्नीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

राहुल खरात याचा विवाह 30 एप्रिल 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर इथल्या पूजा मुकुंद सकपाळ हिच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच राहुलला पूजा ही दुसऱ्या मुलासोबत चॅटिंग करत असल्याचे निदर्शनास आले. विचारणा केली असता, पूजाने तिचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले. या प्रकरणावरून दोन्ही कुटुंबांत वाद झाला. 9 मे रोजी पूजाचे आई-वडील आणि भाऊ तिला घेऊन माहेरी निघून गेले.

फिर्यादीनुसार, पूजा माहेरी गेल्यानंतर तिने पती राहुल याला व्हॉट्सॲपवर तिचे व प्रियकराचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवले. मला घटस्फोट हवा आहे, नाहीतर हे व्हिडिओ फेसबुक आणि युट्युबवर व्हायरल (Social Media) करेन, अशी धमकी तिने दिली. या मानसिक त्रासामुळे राहुल प्रचंड दडपणाखाली होता. याच विवंचनेतून त्याने 11 मे रोजी पहाटे राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ​

Shrirampur Crime
Girlfriend Family Assault : लव्ह स्टोरीचा दुर्दैवी शेवट! प्रेयसीसोबत दिसताच, बेदम मारहाण; नैराश्यात युवकानं संपवलं जीवन, मुलीच्या वडिलांना अटक

पूजा माहेरी जात असताना सासरच्या घरातील 15 ग्रॅमचा नेकलेस, राहुलची अंगठी, सोन्याचे मणी-मंगळसूत्र, झुबे, असे एकूण 41 ग्रॅम सोन्याचे दागिने (किमत सुमारे 6 लाख 15 हजार रुपये) आणि कपाटातील 17 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. मुलाच्या निधनानंतर पूजाला फोन केला असता, तिने दागिने माझ्याकडेच आहेत, काय करायचे ते कर, अशी उद्धट उत्तरे दिल्याचे खरात यांनी म्हटले आहे.

Shrirampur Crime
Hindu girl kidnapping : हिंदू मुलीचं अपहरण, पाच दिवस घरात डांबलं? 'लव जिहाद'नं तणाव!

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

श्रीरामपूर तालुका ​पोलिसात पूजा मुकुंद सकपाळ (पत्नी), मुकुंद हरीभाऊ सकपाळ (सासरा), बेबी मुकुंद सकपाळ (सासू), करण मुकुंद सकपाळ (मेहुणा) आणि आरती पारधे (मेहुणी) यांच्याविरुद्ध फसवणूक, चोरी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com