Rahuri Assembly by-election : तनपुरे-कर्डिलेंचा पक्ष ठरेना! 'भगवी' लढत ठरली, बिनविरोधची शक्यता मावळली

A direct contest is likely between Prajakt Tanpure and Akshay Kardile in the upcoming Rahuri Assembly by-election, sparking political excitement : राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची बिनविरोधची शक्यता माळवली असून तनपुरे-कर्डिले यांच्या चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आहे.
Prajakt Tanpure and Akshay Kardile
Prajakt Tanpure and Akshay KardileSarkarnama
Published on
Updated on

Rahuri election news : राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेत, मतदारसंघात संघात सक्रिय झाले आहे, तर भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले देखील मतदारसंघात सक्रिय आहेत. दोघांचे पक्ष ठरले नसले, तरी दोघांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने, मतदारसंघात 'भगवी' लढत होणार असल्याची चर्चा आहे.

राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुरीच्या दौऱ्यात जाहीर केले होते. फडणवीस यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचे संभाव्य उमेदवार अक्षय कर्डिले व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासमवेत बैठका सुरू केल्या आहेत. परंतु अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

भाजपकडून (BJP) उमेदवारी जाहीर झाली नसली, तरी दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांची उमेदवारी मिळवण्यासाठी ताकदीने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विरोधात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे उभे ठाकले, तर अटीतटीची लढत होणार आहे. प्राजक्त तनपुरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा शब्द देऊन ही निवडणूक एकतर्फी किंवा बिनविरोध करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न सुरू आहे.

Prajakt Tanpure and Akshay Kardile
Rahuri Bypoll : तनपुरे 'भाजप लाइन'वर? सपकाळ-जानकरांची राहुरीत गुप्त 'फिल्डिंग'!

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास, ते कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष म्हणून मैदानात असणार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना, भाजप प्रवेश करू नये, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर किंवा अपक्ष निवडणूक लढा, असा आग्रह धरला आहे.

Prajakt Tanpure and Akshay Kardile
Rahuri Byelection : प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाला विखे पाटलांचा विरोध : जयंत पाटील भाच्यासाठी CM फडणवीसांकडून लावणार फिल्डिंग?

प्राजक्त तनपुरे हिंदुत्वावर स्वार?

या आग्रहाखातर तनपुरे निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यांनी मागील काही महिन्यांपासून जाहीरपणे हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने अपक्ष निवडणूक लढविणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. अक्षय कर्डिले यांना भाजपची उमेदवारी मिळवण्यापासून ताकद लावयाची आहे. अक्षय कर्डिले यांचा त्यात जास्त वेळ जात असल्याने, वरिष्ठांकडून निर्णयाची होत असलेल्या दिरंगाईने, संभ्रम वाढला आहे. असे वातावरण असले, तरी कर्डिले-तनपुरे, अशी अटीतटीची लढत होण्याची शक्यता अधिक आहे. येत्या दोन-तीन दिवसांत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

अक्षय कर्डिलेंसह 15 जणांनी नेले अर्ज

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सोमवारपासून सुरवात झाली. पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. परंतु 15 जणांसाठी एकूण 31 नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. येत्या 6 एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची व अर्ज विक्रीची मुदत आहे. अक्षय कर्डिले यांच्यासह 15 जणांसाठी एकूण 31 नामनिर्देशनपत्र विक्री झाली. बाळू बाबूराव कोळसे, मंगेश मनोहर पांडे, संभाजी लक्ष्मण धोंडे, अल्ताफ इब्राहिम शेख, भारत संजय जगधने (वंचित बहुजन आघाडी), सुनील विनायक तांबे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुरेश ऊर्फ सूर्यभान दत्तात्रेय लांबे (प्रहार जनशक्ती पक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), ज्ञानेश्वर दत्तात्रेय गाडे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), आशिष मोहन जाधव, चंद्रकांत संभाजी दोंदे (बहुजन समाज पार्टी), बाबासाहेब शांत्वन मकासरे (वंचित बहुजन आघाडी), कुमार एकनाथ भिंगारे (रिपाइं -आठवले गट), अमोल बाबासाहेब खाडे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), अभिजित संजय लोंढे, अक्षय शिवाजीराव कर्डिले (भारतीय जनता पक्ष).

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com