Rahuri Bypoll : हिंदुत्वाच्या लाटेवर प्राजक्त तनपुरे! शशिकांत शिंदेंनी दिली मोठी अपडेट, पवारसाहेब अंतिम निर्णय घेणार

Shashikant Shinde reveals Sharad Pawar likely to discuss Rahuri bypoll candidature with Prajakt Tanpure : राहुरी पोटनिवडणुकीच्या उमेदवारीबाबात प्राजक्त तनपुरे यांच्याशी शरद पवार आणि वरिष्ठ नेते चर्चा करतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.
Prajakt Tanpure 1
Prajakt Tanpure 1Sarkarnama
Published on
Updated on

Rahuri Assembly by-election : भारतीय जनता पक्षाने दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना राहुरी पोट निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील जोरदार तयारी केली आहे. प्राजक्त तनपुरे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री होती.

राष्ट्रवादी एकसंघ असताना त्यांना शरद पवार यांनी संधी दिली होती. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर, अहिल्यानगरमधील, राहुरी मतदारसंघातील हिंदुत्वाच्या मुद्यांचा अभ्यास करत, प्राजक्त तनपुरे हिंदुत्वाच्या मुद्यावर पोटनिवडणुकीला समोरे जाताना दिसत आहेत. यातच शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राहुरी पोट निवडणुकीच्या उमेदवारीबाबत शरद पवार निर्णय देतील, अशी मोठी अपडेट दिली आहे.

राहुरी पोटनिवडणुकीसाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही सहा एप्रिल आहे. भाजपने (BJP) अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे देखील मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. तनपुरे-कर्डिले दोघंही हिंदुत्वाच्या मुद्यावर मतदारसंघात सक्रिय आहेत.

प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) भाजपच्या संपर्कात असल्याच्या सुरवातीला चर्चा होत्या. परंतु कर्डिलेंना उमेदवारी जाहीर होताच, सर्व काही चित्र स्पष्ट झालं आहे. तनपुरे हे शरद पवार राष्ट्रवादीकडून उमेदवारी करतील, अशा चर्चांनी जोर धरला आहे. परंतु तनपुरे स्वीकारलेली भगवी हिंदुत्वाची भूमिकेवर शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे लक्ष असणार आहे.

Prajakt Tanpure 1
Rahuri Assembly by-election : तनपुरे-कर्डिलेंचा पक्ष ठरेना! 'भगवी' लढत ठरली, बिनविरोधची शक्यता मावळली

पक्ष पातळीवर निर्णय होईल, त्यात जास्त गुंतून न पडता, प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघात सक्रिय दिसत आहे. अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी मिळवताना, काही प्रमाणात वाट पाहावी लागली. पण आता चित्र स्पष्ट झाल्याने, ते पुढील काळात अधिक वेगाने जाण्याच्या प्रयत्नात असतील. यावेळी त्यांना भाजपचे अहिल्यानगरमधील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांची कशी साथ मिळते, हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Prajakt Tanpure 1
Rahuri Bypoll : तनपुरे 'भाजप लाइन'वर? सपकाळ-जानकरांची राहुरीत गुप्त 'फिल्डिंग'!

शशिकांत शिंदेंकडून मोठी अपडेट

राहुरी पोट निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार निर्णय घेणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिले आहेत. 'राहुरीमधील उमेदरवाबाबत चर्चा झालेली नाही. पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. संबंधित निवडणुकीसाठी वरिष्ठ नेत्यांशी बैठक घेऊन निर्णय घेऊ,' असे शशिंकात शिंदे यांनी म्हटलं.

शरद पवार हे तनपुरेंशी चर्चा करणार

प्राजक्त तनपुरे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत का? पक्षाकडून उमेदवारी मिळू शकते का? यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, "प्राजक्त तनपुरेंशी आपण चर्चा करू. शरद पवार साहेब, जयंत पाटील, सुप्रियाताई सुळे या वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि निर्णय घेतील. राहुरी पोटनिवडणुकीसाठी काय निर्णय घेता येईल, ते लवकरच ठरवू."

नीलेश लंकेंच्या भूमिकेकडे लक्ष

शशिकांत शिंदे यांच्या या प्रतिक्रियेनुसार राहुरी पोट निवडणुकीसाठी शरद पवार लवकरच एन्ट्री करतील, असे संकेत आहेत. दरम्यान, अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके मात्र राहुरी पोट निवडणुकीवर भाष्य करताना दिसत नाहीत. तसेच ते सक्रिय देखील दिसत नाही. लोकसभा निवडणुकीवेळी राहुरीत मोठी सभा झाली होती. त्यामुळे खासदार लंकेंच्या भूमिकेविषयी चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com