Raj Thackeray : मुलांना मराठीसह इंग्रजी बोलता आलं पाहिजे, त्यासाठी राज ठाकरेंनी सुचवला पर्याय...

Raj Thackeray advises Mahayuti government to convert Marathi schools into semi-English, boosting education quality in Maharashtra. हिंदी सक्तीविरोधातील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर राज ठाकरे यांनी आता इंग्रजी भाषेविषयी सरकारला मोठा सल्ला दिला आहे. राज ठाकरे हे नाशिकमध्ये आयोजित शिबिरस्थळी माध्यमांशी बोलत होते.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray : राज्य सरकारने राज्यात तृतीय भाषेचे धोरण लागू करताना पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा केला होता. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या या धोरणाला कडाडून विरोध केला. मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला. राज्यातून तीव्र विरोध वाढल्यानंतर हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हिंदी सक्तीविरोधातील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर राज ठाकरे यांनी आता इंग्रजी भाषेविषयी मोठा सल्ला दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, आपल्या मुलांना मराठीसह इंग्रजी बोलता आले पाहीजे, हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. त्यामुळे जर खरोखर सरकारला मराठी शाळा टिकवायच्या असतील तर त्या सेमी इंग्रजी करणे गरजेचे आहे असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

राज ठाकरे हे नाशिकमध्ये आयोजित शिबिरस्थळी माध्यमांशी बोलत होते. मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजीची गरज आहे हे सांगताना राज ठाकरे यांनी बालमोहन शाळेचे उदाहण दिले. मुंबईतील ही शाळा असून या शाळेला सेमी इंग्रजी केल्यानंतर प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी लागते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शाळा सेमी इंग्रजी माध्यमाची व्हावी असा सल्ला राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

Raj Thackeray
Jalgaon Politics: उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; 13 माजी नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान त्यांनी त्रिभाषा सूत्राबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली. त्रिभाषा सूत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारल्याचा दावा राज ठाकरे यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी केंद्र सरकारकडून त्रिभाषा सूत्राचा अहवाल आला होता, मात्र निर्णय झालेला नव्हता. त्रिभाषा सूत्राबाबत केंद्र सरकारकडून अहवाल आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी समिती नियुक्त करून हा विषय बाजूला ठेवला होता. मात्र, महायुती सरकारने त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी सुरू केली', असे सांगत राज यांनी उद्धव ठाकरे यांचे समर्थन करत बाजू घेतली.

Raj Thackeray
Thackeray Brothers Update: राज ठाकरेंचा नाशिकमध्ये युतीबाबत मोठा दावा; म्हणाले, 'विजयी मेळाव्याचा राजकारणाशी...'

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे मनसेचं राज्यस्तरीय शिबीर होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे शिबीर आयोजित केलं आहे. कालपासून या शिबीराला सुरुवात झाली असून स्वत:राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहे. याच ठिकाणी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. युतीचा निर्णय वेळ घेणारा असतो. युतीबाबतच्या निर्णयाची नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत वाट बघा असं सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com