Thackeray Brothers Update: राज ठाकरेंचा नाशिकमध्ये युतीबाबत मोठा दावा; म्हणाले, 'विजयी मेळाव्याचा राजकारणाशी...'

Raj And Uddhav Thackeray Unite : राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या सकारात्मक चर्चा सुरू असताना तसेच मीरा-भाईंदरच्या यशस्वी आंदोलनानंतर माझ्या परवानगीशिवाय बोलू नका, हा राज ठाकरेंनी दिलेला आदेशाने मनसेसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला असण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अन् शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन घेण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात एकाच व्यासपीठावर एकत्र एन्ट्री घेत संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंतर महिने दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीच्या हालचालींना वेग आला होता. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाशिकमध्ये मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

हिंदीसक्तीच्या विरोधात तब्बल 20 वर्षांनी राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी मराठीच्या मुद्द्यावरुन एकाच व्यासपीठावर येत आगामी पालिका निवडणुकीसाठीच्या नव्या राजकीय समीकरणांचे संकेत दिले होते. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढण्याची चर्चा सुरू झाली होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोमवारी (ता.14) नाशिकमध्ये मनसेच्या तीन दिवसीय शिबिरासाठी दाखल झाले आहेत. त्यापूर्वी राज यांनी मुंबईतील विजयी मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्यावर होता. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. महापालिका निवडणुकांबाबत नोव्हेंबर - डिसेंबर दरम्यान चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर युती संदर्भातील निर्णय बघू, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे म्हणाले, हिंदी सक्तीच्या बाबतील आताच्या सरकारने जीआर काढला होता.मागील सरकारन त्याचा अहवाल स्वीकारला होता.पण त्याचा जीआर काढला नव्हता, अंमलबजावणी केली नव्हती, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या महसूल खात्यातून मोठी बातमी! एकाचवेळी 'या' 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं 'प्रमोशन'; थेट 'IAS' चा दर्जा

राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेनंतर आता युतीचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांचे कार्यकर्ते हे आता पुन्हा एकदा युती होणार की नाही यासंभ्रमात पडले आहेत. याचदरम्यान, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या, मग बघू असं म्हटलं आहे.

राज-उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येण्याच्या सकारात्मक चर्चा सुरू असताना तसेच मीरा-भाईंदरच्या यशस्वी आंदोलनानंतर माझ्या परवानगीशिवाय बोलू नका, हा राज ठाकरेंनी दिलेला आदेशाने राज यांच्या मनात वेगळाच विचार सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Sanjay Jagtap BJP entry : भाजप प्रवेश करताच काय मिळणार? संजय जगतापांनी केलीय 'बिगर हुंड्याची सोयरीक'

राज ठाकरेंनी ट्विटवरून एक स्पष्ट आदेश म्हणत ट्विट केले.ट्विटमध्ये त्यांनी, 'एक स्पष्ट आदेश...पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं,वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही.तसंच स्वतःच्या प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.

तसेच माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे, त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय,माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये,आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.'

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Beed News : निवडणुकीत'तुतारी'चे काम केले, वाल्मीक कराड गँगकडून जीवे मारण्याची धमकी!

राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या सकारात्मक चर्चा सुरू असताना तसेच मीरा-भाईंदरच्या यशस्वी आंदोलनानंतर माझ्या परवानगीशिवाय बोलू नका, हा राज ठाकरेंनी दिलेला आदेशाने मनसेसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला असण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com