Nashik MNS : राज ठाकरेंच्या मनसेसोबत मोठा गेम, माजी नगरसेविकेने आधी उमेदवारी अर्ज मागे घेतला अन् आता थेट भाजपध्येच प्रवेश केला

Nashik municipal election : नाशिकमध्ये भाजपने मोठी खेळी खेळली आहे. मनसेच्या महिला नेत्याला गळाला लावत भाजपत प्रवेश करवून घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का दिला आहे.
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. निवडणुकीच्या तोंडावर मनसेला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता डेरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

सुजाता डेरे यांनी नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग १२ क मधून उमेदवारी अर्ज भरला होता. मनसे पक्षाकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला असतानाही त्यांनी अचानक आपली अधिकृत उमेदवारी मागे घेतली होती.

त्यांनी अचानक घेतलेल्या माघारीच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र आज झालेल्या त्यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे त्या निर्णयामागची पार्श्वभूमी स्पष्ट झाली आहे. या घडामोडीमुळे मनसेला मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र आहे.

Raj Thackeray
BJP AB Form Scam : एबी फॉर्म वाटप गोंधळाची चौकशी होणार, भाजपचा बडा नेता नाशिकमध्ये..कुणाची वाढली धडधड?

माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर भाजपने प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आज रविवार (दि. ४) चा मुहूर्त निवडला आहे. त्यासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण हे आज नाशिकमध्ये आहेत. त्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे. शहरातील हनुमानवाडी रोडवरील श्रद्धा लॉन्स येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याआधी श्रद्धा लॉन्स येथे भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता डेरे यांच्यासह इतर पक्षांतील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

तब्बल १८ वर्षांनंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू मुंबईप्रमाणेच नाशिकमध्येही एकत्र आले आहेत. प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू देखील नाशिकमध्ये येणार आहे. ९ जानेवारीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेचे नियोजन मनसेकडून नाशिकमध्ये करण्यात येत आहे.

Raj Thackeray
Nashik Shiv Sena : नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत खळबळ, उमेदवाराचा पत्नीसह जीवन संपवण्याचा इशारा..नेमकं प्रकरण काय?

मुंबई नाशिकसह राज्यातील विविध ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधूंनी युती करुन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून नाशिकमध्ये मनसेनेने मविआ सोबत घरोबा केला आहे. महाविकास आघाडीतील चौथा मित्र पक्ष असलेल्या मनसेच्या वाट्याला ३३ जागा मिळाल्या होत्या. पण शुक्रवारी (ता. २) अर्ज माघारीच्या दिवशी मनसेला मोठा धक्का बसला. प्रभाग १६ मधील मीरा सहाणे, प्रभाग १८ मधील रोहिणी पिल्ले तसेच प्रभाग १२ मधून सुजाता डेरे यांनी त्यांचे अर्ज माघारी घेतले. त्यामुळे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला गेला. माघारीनंतर मनसेचे आता ३० उमेदवार हे निवडणूकीच्या रिंगणात लढत देत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com