Nashik Shiv Sena : नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत खळबळ, उमेदवाराचा पत्नीसह जीवन संपवण्याचा इशारा..नेमकं प्रकरण काय?

Nashik Mahanagarpalika Election 2026 : नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या शिंदे सेनेच्या उमेदवाराने आयुष्याचा शेवट करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.

Eknath Shinde Nashik Municipal Corporation
Eknath Shinde Nashik Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. प्रभाग क्रमांक 31 मधील इच्छुक उमेदवार शिवा तेलंग यांनी पत्नीसह जीवन संपविण्याचा इशारा दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवा तेलंग यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पत्र लिहून पक्षातील स्थानिक काही दिग्गज नेत्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

शिवा तेलंग यांनी आपल्या पत्रात माजी नगरसेवक सुदाम ढेमसे यांच्यासह स्थानिक प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवा तेलंग यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, २०२२ पासून प्रभाग ३१ मध्ये मी शिवा तेलंग आणि माझी पत्नी पुजा तेलंग दोघेही सक्रिय असून समाज सेवा केली. अनेक विकास कामे केली. लोकांच्या सुखदु:खात आम्ही दोघे पती-पत्नी उभे राहिलो. पक्षाने दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. पक्षाचे नाव चर्चेत ठेवले. पण माजी नगसेवक सुदाम ढेमसे यांनी आमचा केवळ राजकीय वापर करून घेतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, २९ तारखेला कॅनडा कॉर्नर येथे एबी फॉर्मचे वाटप सुरू असताना मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

तेलंग यांनी पत्रात पुढे लिहलं आहे की, पक्षप्रवेशाच्या वेळी मोठ्या निधीची कमिटमेंट करण्यात आली होती. त्यानंतर प्रभागात तब्बल 11 कोटी रुपयांचा निधी आला, मात्र त्या निधीचे फक्त भूमिपूजन झाले, कामे कुठेच झाली नाही. मग आलेला निधी नेमका कुठे गेला, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. माझ्यासोबत राहून माझ्या पाठीत खंजीर खुपसला. आतापर्यंत शिवसेनेचं संपर्क कार्यालय सुद्दा प्रभागात नाही. अमोल जाधव यांनी पण निधी आणला पण कामे कुठेच झाले नाही. फक्त चेतना नगरमध्ये हॉल बांधले तेव्हढेच. मग एवढा मोठा निधी गेला कुठे याची चौकशी व्हावी असं तेलंग यांनी पत्रात म्हटलं आहे.


Eknath Shinde Nashik Municipal Corporation
Tara Bhawalkar On Tapovan : तपोवनावरील कुऱ्हाड थांबवा, तारा भवाळकरांनी मुख्यमंत्र्यांंसमोरच काढला विषय

फॉर्मसाठी पैशांची मागणी करण्यात आली आणि पैसे घेऊनच फॉर्म देण्यात आले. एकाच प्रभागात दोन जणांना एबी फॉर्म दिल्याने संभ्रम निर्माण झाला. हेमंत गोडसे, विजय करंजकर, जयंत साठे, राजू लवटे, आणि प्रवीण बंटी तिदमे यांसारख्या नेत्यांचा या प्रक्रियेत सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊनही स्थानिक पातळीवर वरिष्ठांच्या आदेशाला फेटाळण्यात आले, असेही ते म्हणाले.

29 तारखेला रात्री कॅनडा कॉर्नर येथे एबी फॉर्मचे वाटप सुरू असताना मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाली. एबी फॉर्मसाठी पैशांची मागणी करण्यात आली आणि पैसे घेऊनच फॉर्म देण्यात आले. एकाच प्रभागात दोन जणांना एबी फॉर्म दिल्याने संभ्रम निर्माण झाला. हेमंत गोडसे, विजय करंजकर, जयंत साठे, राजू लवटे, आणि प्रवीण बंटी तिदमे या नेत्यांचा या प्रक्रियेत सहभाग असल्याचा आरोप तेलंग यांनी केला आहे.


Eknath Shinde Nashik Municipal Corporation
MLA Suresh Bhole : जळगावात भाजपचा विसरभोळा आमदार, घराणेशाहीचा नियम विसरुन मुलाला केलं बिनविरोध नगरसेवक

पक्षश्रेष्ठींकडून आपल्याला पुरस्कृत करण्याचे आदेश दिले असतानाही ते अमलात न आणल्याचा आरोप सुदाम ढेमसे यांच्यावर तेलंग यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊनही स्थानिक पातळीवर वरिष्ठांच्या आदेशाला फेटाळण्यात आले व निर्णय बदलण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मी उद्या तुमच्यामध्ये नसणार आहे

पत्राच्या शेवटी शिवा तेलंग यांनी जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे. आपल्या संभाव्य आत्महत्येस सुदाम ढेमसे, विजय करंजकर, हेमंत गोडसे, अनिल गायकवाड, अमोल जाधव, रवी धामणे, अजय पाटील आणि अजय बोरस्ते हे जबाबदार राहतील, असा स्पष्ट उल्लेख त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पत्रात केला आहे. मी उद्या तुमच्यामध्ये नसणार आहे,” असे नमूद करत त्यांनी पत्नी व मुलांना न्याय देण्याची विनंती नागरिकांना केली आहे.

दरम्यान, हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून शिवा तेलंग व त्यांच्या पत्नी हे ‘नॉट रिचेबल’असून कोणाच्याही संपर्कात नाही. दरम्यान या प्रकारामुळे शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून तिकीट वाटपाची पद्धत आणि त्यातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे या प्रकरणाची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com