राज ठाकरेंच्या राजकीय डावपेचात मशिदींसह मंदीरेही अडचणीत?

राज ठाकरेंच्या इशाऱ्यामुळे भोंग्याबाबत धार्मिक स्थळांना पोलिसांकडून नोटिसा
Raj thakre With temples
Raj thakre With templesSarkarnama
Published on: 
Updated on: 

नाशिक : भोंगे प्रकरणासंदर्भात भद्रकाली पोलिसांकडून (Police) धार्मिक स्थळांना नोटीस बजावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मशिदींना (Mosque) नोटिसा बजावण्यात आले असून, मंदिरांना (Temples) आज पासून नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. शहरातील अनेक मंदीरांत सुरु असलेल्या उपक्रमांना त्यामुळे अडथळा येऊ शकतो. राज ठाकरे (Raj Thakre) यांच्या राजकीय डावपेचांत मशिदींबरोबरच मंदिरेही अडचणीत आली आहेत.

Raj thakre With temples
रावेरला उघड झाला दीड कोटींचा ‘टॉयलेट घोटाळा’

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सर्व धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी अधिकृत परवानगी घेण्याचे आदेशित केले आहे. परवानगी न घेता भोंगे लावल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यातर्फे धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांना भोंगे लावण्याबाबत नोटीस दिली आहे. अधिकृत परवानगी घेणे, आवाजाची क्षमता न्यायालयाने ठरवून दिलेल्या मर्यादेत असावी. अन्यथा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती विश्वस्तांना व्हावी, त्यांनी ३ मेच्या आत धार्मिक स्थळावर भोंगे लावण्याची परवानगी घ्यावी, असे नोटिशीत म्हटले आहे.

Raj thakre With temples
शिक्षण विभाग बदनाम; आधी लाचखोरी आता महिलेवर अत्याचार?

मंगळवार, बुधवार अशा दोन दिवसात भद्रकाली पोलिसांकडून २१ मशिदींना नोटीस बजावण्यात आली आहे. मंदिर तसेच अन्य धार्मिक स्थळांना गुरुवारी नोटीस बजावण्याचे काम सुरू होणार आहे. धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी त्यानुसार लवकर पोलिस आयुक्तालय तसेच सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधत अधिकृत परवानगी घेण्यात यावी, अशा सूचनादेखील यावेळी करण्यात आल्या.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com