Vivek Kolhe V/S Rajendra Vikhe : 'शिक्षक'साठी बड्या नेत्यांची एन्ट्री; विवेक कोल्हेंपाठोपाठ विखे मैदानात...

Nashik Teachers Constituency : नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या निवडणुकीत बड्या संस्थानिकांची नावे पुढे आल्याने शिक्षकांमधून इच्छुक असलेल्या उमेदवारांना धडकी भरली आहे. भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे आणि आता विखे परिवारातील डाॅ. राजेंद्र विखे यांची नाव चर्चेत आले आहे.
Vivek Kolhe V/S Rajendra Vikhe
Vivek Kolhe V/S Rajendra Vikhesarkarnama

Nashik Teachers Legislative Council Election : नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्यापाठोपाठ विखे परिवारातील डाॅ. राजेंद्र विखे यांचे देखील नाव चर्चेत आले आहे. शैक्षणिक संस्थानिकांची नावे चर्चेत आल्याने अनेकांना धडकी भरली आहे. वात्यामुळे यंदाची शिक्षक विधानपरिषदेची निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत.

शिक्षक विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे इच्छुक आहे. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे आणि आता विखे परिवारातील डाॅ. राजेंद्र विखे यांचे नाव चर्चेत आले आहे. बड्या संस्थानिकांची नावे चर्चेत आल्याने शिक्षक मतदारसंघात शिक्षकांमधून इच्छुक असलेल्या उमेदवारांना धडकी भरली आहे. नाशिक (Nashik) विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आयोगाने पुढे ढकलली असून, लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निकालानंतर ही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मतदान प्रक्रिया होऊ शकते. निवडणूक होणार असल्याने इच्छुकांनी तयारीला सुरूवात केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vivek Kolhe V/S Rajendra Vikhe
Girish Mahajan Politics: गिरीश महाजनांनी दिंडोरीत केलेला प्रयोग यशस्वी होणार का?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्यांनी शिक्षक लोकशाही आघाडीकडून (टीडीएफ) उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे शिक्षक विधानपरिषदेच्या निवडणुकीत टीडीएफ महत्त्वं आले. टीडीएफने शिर्डीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर दराडे (नाशिक), भाऊसाहेब कचरे (नगर), निशांत रंधे (धुळे), पदवीधर निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाकडून लढलेल्या उपनेत्या शुभांगी पाटील (नाशिक), आर. डी. निकम (नाशिक), इंदिरा काँग्रेसचे नेते संदीप गुळवे (नाशिक), एन. डी. नांद्रे (नंदुरबार), अर्जुन कोकाटे (नगर), नीलिमा आहिरे (नाशिक) यांनी शिक्षक लोकशाही आघाडीकडे मुलाखती देऊन उमेदवारी मागितली आहे. Nashik Teachers Legislative Council Election Update

विखे-कोल्हे संघर्ष वाढण्याची शक्यता...

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट सहभागी आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार आशुतोष काळे अजित पवारांबरोबर आहे. महायुतीमधील भाजपच्या नेत्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे याच मतदारसंघातील आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी महायुतीत पेच निर्माण झाला आहे. आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून निश्चित मानली जाते. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी महायुतीतील भाजपचे BJP वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत. यातून भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ. राजेंद्र विखे यांनी देखील निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. यामुळे गेल्या विखे-कोल्हे यांच्यातील संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Vivek Kolhe V/S Rajendra Vikhe
Dindori Constituency 2024 : चांदवडमध्ये केलेले अथक परिश्रम भाजपला यश देणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com