Rajesh Parjane News : 'महानंद'वरून परजणे खासदार राऊतांवर संतापले

Mahanand Issue : महानंदवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापले
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघाची शिखर संस्था असलेली महानंदवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. विरोधकांकडून राज्यातील सत्ताधारी महायुतीवर आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. महानंदची 27 एकर जमीन गुजरात लॅाबीला द्यायची आहे. महानंदाचे चेअरमन राजेश परजणे हे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे असल्याचे हा प्रकार जोरात सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खासदार राऊत यांच्या या टीकेला परजणे यांनी अगोदर 'एनडीडीबी' काय आहे, हे अगोदर समजून घ्या, असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राजेश परजणे म्हणाले, "शिवसेनेचे खासदार संजय राऊत (उबाठा गट) यांनी एनडीडीबी (NDDB)काय आहे हे, समजून घ्यावे. महानंद एनडीडीबीला (NDDB)चालवायला द्यावे हे संचालक मंडळाने सरकारला सुचवले आहे. संजय राऊत चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप करत आहे. या चुकींच्या आरोपामुळे सहकाराचे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, यांच्याच सहकाऱ्यांनी महानंद एनडीडीबीला चालवण्यासाठी द्यावे, असे अधिवेशनात म्हटले होते". फक्त मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर आरोप करून स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा खासदार राऊत यांचा प्रयत्न आहे. राऊत यांना विसरभोळेपणाचा विकास जडला आहे. दूध व्यवसायात राजकारण आणू नये. शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळू नका, असेही परजणे यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut
Shinde Vs Thackeray : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे-ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू!

एनडीडीबी संस्थेचे कार्यालय गुजरातमध्ये असल्याने महानंद गुजरातला देण्याचा समज झाला असावा. मात्र महानंद आर्थिक अडचणीत आहे. राज्य सरकारकडे चालवण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र यावर सरकारने निर्णय घ्यायला हवा. वाढीव कर्मचारी आणि वेतनाचा बोजा आहे. संस्था टिकवण्यासाठी तो एनडीडीबीला देण्याच्या पर्यायाचा अवलंब करावा लागेल, नाहीतर आणखी अडचणी वाढून महानंद बंद करावी लागेल, अशी भीती देखील चेअरमन राजेश परजणे यांनी व्यक्त केली.

कुणी-कोणाचा नातेवाईक असणे पाप आहे का?

महानंद बंद करणे हे योग्य नाही, असे आम्हा सर्व संचालकांचे म्हणणे आले आहे. त्यामुळे पर्यायांची चाचपणी सुरू आहे. राज्य सरकारकडे त्यातून प्रस्ताव सादर केला आहे. यातच पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे आहेत. त्यात ते माझे मेहुणे आहेत. कुणी-कोणाचा नातेवाईक असणे हे पाप नाही. नातेसंबध असणे चुकीचे नाही. राधाकृष्ण विखे मंत्री असले तरी आमचे अस्तित्व वेगळ असल्याचे राजेश परजणे यांनी म्हटले आहे.

(Edited By - Chaitanya Machale)

Sanjay Raut
Nashik Politics : भाजपकडे मतं मागण्यासाठी मुद्दा तरी आहे का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com