Iran War Hits Agriculture: इराण युद्धाची शेतीला धग, राजू शेट्टींची दिल्लीत सरकार विरोधात दिल्लीत जमवाजमवा!

Raju Shetti farmers protest against government: इराण युद्धामुळे जहाजे बंदरात अडकली, महाराष्ट्रातील द्राक्षे, कांदा, भाजीपाल्याच्या निर्यातीला झळ बसणार, शेतकरी संकटात.
raju shetti statement on iran war agriculture
raju shetti statement on iran war agricultureSarkarnama
Published on
Updated on

How iran war affects farmers in india: इराण-अमेरिका युद्धाची धग विविध देशांना बसली आहे. जागतिक अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे. सर्वात मोठा फटका महाराष्ट्रातील कृषी निर्यातीला बसला आहे. त्यामुळे निर्यातदार शेतकरी असहाय बनला आहे.

इराण अमेरीका युद्धामुळे जगभरातील जलवाहतूक प्रभावित झाली आहे. विशेषता खाडी देशांशी होणारी व्यावसायिक जलवाहतूक खंडित झाली आहे. मुंबई बंदरात शेतीमालाची जहाजे अडकली आहेत. त्याचा सर्वात मोठा फटका शेतीला बसला आहे.

मुंबई आणि अन्य बंदरांमध्ये आखाती देश व अन्यत्र होणाऱ्या द्राक्ष, फळे आणि अन्य शेतीमालाची चहाचे अडकून पडली आहे. गेल्या महिनाभरापासून यातील अनेक जहाजे अडकली आहेत. जहाजातील शेतकऱ्यांच्या निर्यातीची द्राक्षे, फळे आणि अन्य शेतीमाल निर्यात होऊ शकला नाही.

raju shetti statement on iran war agriculture
Iran War Impact : युद्धाची झळ खिशाला! इराण संघर्ष 23 दिवसांवर, इंधनासह अन्नदर वाढीचा धोका

आणखी काही काळ ही जहाजे बंदरात अडकून पडल्यास त्याचा मोठा परिणाम होईल. जहाजातील निर्यातक्षम शेतीमाल खराब होण्याची शक्यता आहे. असे घडल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसेल.

raju shetti statement on iran war agriculture
Iran oil threat : ट्रम्प यांनी धमकी देताच इराणचा जगाला धडकी भरविणारा इशारा; एक लिटरही तेल...

इराण आणि अमेरिकेतील युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. संदर्भात केंद्र शासनाकडून जल वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. शासनाच्या या नाकर्त्या भूमिकेचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रातील आणि देशातील शेतीला बसणार आहे.

या प्रश्नाकडे अद्याप केंद्रशासन अथवा कोणीही लक्ष घातलेले नाही. या पार्श्वभूमीवर भारत अमेरिका व्यापार करार आणि इराण युद्धाचा जलवाहतुकीवर झालेला नकारात्मक परिणाम यावर विरोधी पक्षांनी सरकारला इशारा दिला आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच दिल्लीत झालेल्या बैठकीत भूमिका मांडली.

डाव्या आघाडीच्या आणि किसान सभेच्या नेत्यांसह विविध संघटना या प्रश्नावर नवी दिल्लीत एकत्र आले आहेत. त्यात माजी खासदार शेट्टी यांनीही जमवाजमव करून शेतकऱ्यांसाठी आवाज उठविला आहे. पुढील आठवड्यात पुन्हा एकदा बैठक होऊन केंद्र शासनाला विरोधात आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.

केंद्र शासनाने पुढाकार घेऊन आखाती देशांतील कृषी निर्यात व्यापार सुरळीत करावा. अन्यथा त्याची मोठी झळ शेतकऱ्यांना बसेल. एकीकडे रासायनिक खतांचा तुटवडा व महागाई आणि दुसरीकडे पिकवलेल्या मालाची धूळधाण अशा स्थितीत केंद्र शासनाने तटस्थ राहून चालणार नाही. सरकारने पुढाकार घेऊन शेतीमालाची निर्यात पूर्ववत करावी अशी मागणी माजी खासदार शेट्टी यांनी केली.

कार्पोरेट कंपन्यांना शेती क्षेत्रातून बाहेर काढावे. शेतीमालाला एम एस पी लागू करावी. निर्यात तिथे अडथळे दूर करावे, यासाठी अखिल भारतीय किसान सभा व अन्य डाव्या चळवळीतील नेते एकत्र येत आहेत. बैठकीला खासदार व्ही. एम. सिंग, खासदार राजाराम सिंग (बिहार), सुदामा प्रसाद, माजी खासदार हनन मौला, किसान सभेचे अध्यक्ष राजन क्षीरसागर, अर्जुन सिंग राजपूत यांसह अनेक नेते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com