Helicopter Emergency Landing : हवेतच तांत्रिक बिघाड! उत्तराखंडच्या राज्यपालांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग; नेमकं काय घडलं?

A helicopter carrying Uttarakhand Governor Lt Gen Gurmit Singh made an emergency landing in Srinagar of Pauri Garhwal after a technical snag was detected mid-air : उत्तराखंडचे राज्यपाल तथा निवृ्त्त लेफ्टिनंट जनरल गुरमीत सिंग यांच्या हेलिकाॅप्टरमध्ये हवेतच तांत्रिक बिघाड झाल्याने, आपातकालीन लँडिंग करावं लागलं.
Governor Lt Gen Gurmit Singh
Governor Lt Gen Gurmit SinghSarkarnama
Published on
Updated on

Uttarakhand governor helicopter news : महाराष्ट्रातील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी मृत्यूनंतर राजकीय नेत्यांच्या हवाई प्रवासाची सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेतला विषय आहे.

आता उत्तराखंडचे राज्यपाल तथा निवृत्त लेफ्टिनंट जनरल गुरमीत सिंग यांचे हेलिकाॅप्टर हवेतच असतानाच, त्यात मोठा तांत्रिक बिघाड झाला. हे हेलिकाॅप्टर आपातकालीन स्थितीत उतरावं लागल्यानं मोठी दुर्घटना टळली.

राज्यपाल (Governor) तथा निवृत्त लेफ्टिनंट जनरल गुरमीत सिंग हे प्रशासकीय दौऱ्यानिमित्ताने हेलिकाॅप्टरने (Helicopter) चालले होते. हेलिकाॅप्टरचे उड्डाण झाल्यानंतर त्यात अडथळे येत होते. पायलटच्या ही बाब लक्षात येताच, त्याने हेलिकाॅप्टर तत्काळ हवेतून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.

पायलटने आपातकालीन स्थितीत, हेलिकाॅप्टरला पौडी गढवालमधील श्रीनगर इथं उतरवलं. पोलिसांनी (Police) या माहितीला दुजोरा दिला. राज्यपाल गुरमीत सिंग यांचं हेलिकॉप्टरला श्रीनगर गढवालमधील जीव्हीके हेलिपॅडवर उतरवण्यात आलं. यानंतर राज्यपाल गुरमीत सिंग यांना श्रीनगर इथल्या पोलिस गेस्ट हाऊसमध्ये नेण्यात आलं.

Governor Lt Gen Gurmit Singh
Girish Mahajan Nashik Guardian : महाजनांचा मोठा दावा! 'नाशिकचा पालकमंत्री मीच'; शिंदेसेना-राष्ट्रवादीनं कान टवकारले

राज्यपाल गुरमीत सिंग यांच्या हेलिकाॅप्टरचे आपातकालीन स्थितीत केलेल्या लँडिंगपूर्वी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी समोर आली होती. त्यांचे तर हेलिकाॅप्टर हे दोन हजार फुटांवर होतं. तेथून आपातकालीन स्थितीत लँडिंग करण्यात आलं.

Governor Lt Gen Gurmit Singh
Minab Girls School Attack : 150 शाळकरी मुलींच्या मृत्यूने जग हादरलं; ‘हल्ल्यामागे इराणच’, डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याबरोबर तब्बल सहा जण हेलिकाॅप्टरमध्ये होते. हे हेलिकाॅप्टर हवेत असतानाच, त्यातून धुराचे लोट येत होते. यापूर्वी देखील केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकाॅप्टरचे चार वेळा आपातकालीन स्थितीत लँडिंग करण्यात आलं होतं. नागरी विमान वाहतूक संचालक इशान प्रताप सिंह यांनी हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडाच्या चौकशीचा आदेश दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com