Nilesh Lanke Meet Gaja Marne Video : नीलेश लंके वादाच्या भोवऱ्यात, खासदार होताच गुंड गजा मारणेच्या दारी!

Gaja Marne and Nilesh Lanke : गजा मारणे याच्यावर खंडणी, खून, अपहण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. पुणे आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरात अनेक गुन्हे केल्याची नोंद गुंड मारणे याच्यावर आहेत.
MP Nilesh Lanke-Gangster Gajanan Marne
MP Nilesh Lanke-Gangster Gajanan Marne Sarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : पुण्यातील प्रसिद्ध गुंड गजा मारणे याच्याकडून खासदार निलेश लंके यांनी सत्कार स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे

निवडणुकीच्या तोंडावर प्रचंड गाजावाजा करून ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून उमेदवारी मिळविलेले आणि नगर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे बलाढ्य उमेदवार सुजय विखे पाटील यांचा पराभव करून दिल्लीच्या राजकारणात गेलेले खासदार नीलेश लंके आता एका नव्या वादात सापडले आहेत. कुख्यात गुंडाबरोबरचा लंके यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या प्रकारामुळे खासदार लंके आता राजकीय वर्तुळात टीकेचे धनी ठरत आहेत. खासदार लंके यांना या गुंडाच्या घरी जाण्याची गरज काय पडली, असा प्रश्न विचारला जात आहे. दोन दिवसांपूर्वी खासदार लंके पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी गुंड गजा मारणे याची भेट घेतल्याचे समोर आले आहे.

MP Nilesh Lanke-Gangster Gajanan Marne
Nilesh Lanke Vs Bajrang Dal : 'हिरवा रंग उधळला, बजरंग दल संतापला'; खासदार लंकेंच्या मिरवणुकीत नेमकं काय झालं...

गजा मारणे याच्यावर खंडणी, खून, अपहण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. पुणे आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरात अनेक गुन्हे केल्याची नोंद गुंड मारणे याच्यावर आहे. मोक्काच्या गुन्ह्यात तो काही दिवस तो जेलमध्ये देखील होता.

पुणे पोलिसांनी नुकतीच शहरातील गुंडांची हजेरी घेत, झाडाझडचती घेतली होती. त्यावेळी हा गुंड मारणे याचा देखील समावेश होता. त्याच मारणे याची खासदार लंके यांनी भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात नीलेश लंके यांनी नगर लोकसभेची निवडणूक लढविली होती. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. यामध्ये लंके यांनी विखे पाटील यांचा दारूण पराभव करत त्यांच्या साम्राज्याला जोरदार धक्का दिला.

आता त्याच खासदार लंके यांनी गुंड मारणे याची भेट घेत त्याच्याशी चर्चा केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. खासदार झाल्यानंतर लंके यांनी ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. गुंड गजा मारणे याच्याकडून सत्कार स्विकारल्याच्या व्हिडीओमुळे खासदार लंके यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता असून भाजप या संधीचा फायदा करुन घेत खासदार लंके यांना अडचणीत आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com