Ravikant Tupkar : पीकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसांच्या वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.
यावेळी शेतकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार देखील केला होता. त्यानंतर पोलिसांनी तुपकरांना ताब्यात घेतले होते. मात्र, त्यानंतरही तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आता याच पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'शेतकऱ्यांचं हे आंदोलन नौटंकी आंदोलन आहे', असं म्हटलं आहे.
गुलाबराव पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, ''शेतकऱ्यांचे हे आंदोलन नौटंकी आंदोलन आहे. आंदोलनाचे अनेक मार्ग आहेत. आपण देखील आंदोलनं केलेली आहेत. मात्र, हे नौटंकी आंदोलन आपल्याला पसंत नाही. असा अतिरेक करणं चुकीचे आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार करणं हे चुकीचं आहे'', असं पाटील यावेळी म्हणाले.
दरम्यान, पीकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन, कापसाला भाव मिळावा यासाठी बुलढाण्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला गुलाबराव पाटील यांनी नौटंकी आंदोलन म्हटल्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
तसेच तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन हे काल शनिवारपासून (दि.11 फेब्रुवारी) सुरू आहे. तसेच शनिवारी तुपकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. मात्र, सरकार आता तुपकरांच्या आंदोलनावर काय भूमीका घेतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.