Jalgaon District Bank : खडसेंना धक्का; जळगाव जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी बंडखोर संजय पवार विजयी

एक महिन्यापूर्वी बॅंकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
Jalgaon District Bank :
Jalgaon District Bank :
Published on
Updated on

जळगाव जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीत बंडखोर उमेदवार संजय पवार विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार विजयी झाले आहे. संजय पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण नंतर त्यांनी बंडखोरी केली. निवडणुकीवेळी शिंदे गट, भाजप आणि ठाकरे गटाच्या एका सदस्याने त्यांना पाठिंबा दिल्याने संजय पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अमोल चिमणराव पाटील शिंदे गट यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

एक महिन्यापूर्वी बॅंकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच, श्यामकांत सोनवणे यांनी देखील उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. पवार यांना 11 मते तर राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील यांना 10 मते पडली.

Jalgaon District Bank :
Patole News : सोमय्यांकडे ईडीची कागदपत्रं कशी पोहोचतात? कॉंग्रेस आक्रमक, सोमवारी राज भवनावर धडकणार !

जळगाव जिल्हा बँकेवर सध्या महाविकास आघाडी- शिवसेना (शिंदे गट) सत्ता होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला (Shivsena) दोन वर्ष तर राष्ट्रवादीला तीन वर्षे असा अध्यक्षपदासाठीचा फार्म्युला ठरला होता. तर प्रत्येकी एक वर्षासाठी राष्ट्रवादीकडून (NCP) नवीन व्यक्तीला अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला होता.

त्यानुसार गुलाबराव देवकर यांची अध्यक्ष आणि आणि श्‍यामकांत सोनवणे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती. दोघांचाही वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दोघांनी राजीनामा दिला. त्यानंतर ४ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा बँकेच्या संचालकांची एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गुलाबराव देवकर ही राजीनामा देणार असल्याची माहिती दिली होती.

गुलाबराव देवकर यांनी राजीनामा दिल्यानंतर बँकेच्या पुढील अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, संजय पवार, अॅड. रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या नावांची चर्चा होती. पण रवींद्र पाटील यांना उमेदवारी दिल्याने संजय पवार यांनी बंडखोरी केली. शिंदे गट, भाजप आणि ठाकरे गटाच्या मिळून ११ सदस्यांनी संजय पवार यांच्या बाजूने मतदान केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com