Nagar News : शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुती (शिवसेनेचे) उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थित अर्ज भरला.
मात्र, कोपरगावमधील भाजप नेत्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे अनुपस्थित होते. यामुळे विखे आणि कोल्हे यांच्यातील राजकीय वादाची किनार लोखंडे यांच्यावर उमेदवारी अर्ज दाखल करताना पुन्हा पुढे आली. कोल्हे यांची अनुपस्थिती शिर्डी लोकसभेत कोणती भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघावर (Kopargoan Vidhansabha Constituency) भाजप नेत्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची मजबूत पकड आहे. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना कोल्हे यांची नाराजी परवडणारी नाही. लोखंडे यांनी काल अर्ज भरताना शिर्डीत मोठे शक्तिप्रदर्शन केले.
परंतु माजी आमदार कोल्हे आणि त्यांचे पुत्र युवा नेते विवेक कोल्हे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने पुढे आली. कोल्हे यांची अनुपस्थिती ही चर्चेचा विषय ठरली. राधाकृष्ण विखे पाटील आणि कोल्हे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. अलीकडच्या काळात विखे आणि कोल्हे यांच्यात वाद वाढतच चालला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिर्डीतील साईबाबा संस्थानमधील सोसायटीच्या निवडणुकीत कोल्हे यांच्या गटाने मिळवलेला विजय विखे यांच्या जिव्हारी लागला आहे. तसेच कोपरगाव आणि राहाता येथील एमआयडीसीचा रंगलेला श्रेयवादातून हा वाद आणखीच पुढे सरकला आहे.
विखे पाटील यांनी कोपरगावमध्ये एमआयडीसीच्या मंजुरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे Ashutosh Kale यांना बरोबर घेऊन केलेल्या कार्यक्रमानंतर हा वाद आणखीच विकोपाला गेला आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात विखे आणि कोल्हे एकमेकांना राजकीय शह देण्याची संधी सोडत नाहीत, असेच काहीसे चित्र आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील Shirdi Loksabha Constituency खासदारकीच्या उमेदवारासाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात निर्णायक भूमिका असते. त्यामुळे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची नाराजी खासदार सदाशिव लोखंडे Sadashiv Lokhande यांना परवडणारी नाही.
विखे आणि कोल्हे यांच्या वादापासून लोखंडे दूर आहेत. तरी लोखंडे प्रचारानिमित्ताने लवकरच कोल्हे यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. असे असले, तरी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विखे आणि कोल्हे पुढे एकत्र येणार का, अशी चर्चा रंगली आहे.
खासदार सदाशिव लोखंडे यांना निवडणूक आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर सोपावली आहे. तशी जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.
मंत्री विखे यांना थोडी मेहनत घ्यावी लागेल, असे सांगितले होते. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मेहनत वैगेर काही मला माहीत नाही. लोखंडे यांचा विजय झाला पाहिजे, असे म्हटल्यावर विखे यांनी लोखंडे यांच्या विजयाची गॅरंटी आम्ही घेतली आहे, असे जाहीर केले.
नेवासा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तीन आमदार आहेत. हे तीन माजी आमदार महायुतीच्या उमेदवारासाठी कोठेही प्रचारात दिसले नाही. त्यांना प्रचारात सहभागी करून घ्यावे. त्यांनी आत एक आणि बाहेर एक असे करू नये, असे म्हणत भाजप माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.
Edited By : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.