Suhas Kande Politics: कांदे- भुजबळ लढतीत नांदगावमध्ये जरांगे फॅक्टरचा नवा ट्वीस्ट!

Sameer Bhujbal; invisible Manoj jarange effect in Nandgaon, four major candidates fight-नांदगाव मतदार संघात 14 उमेदवारांची माघार, आता होणार चौरंगी लढत.
Dr Rohan Borse, MLA Suhas Kande, Sameer Bhujbal & Ganesh Dhatrak
Dr Rohan Borse, MLA Suhas Kande, Sameer Bhujbal & Ganesh DhatrakSarkarnama
Published on
Updated on

Assembly election 2024: नांदगाव विधानसभा विधानसभा मतदार संघात आज 18 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता 14 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे.

आमदार सुहास कांदे यांना महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी खासदार समीर भुजबळ यांनी आव्हान दिले आहे माजी खासदार यांनी आपल्या पारंपारीक राजकीय विरोधकांना आव्हान देण्यासाठी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

श्री. भुजबळ यांच्या उमेदवारीने महायुतीतील बंडखोरी आता वेगळ्या स्वरूपात स्पष्ट झाली आहे. त्यामुळे नांदगाव मतदार संघाच्या निवडणुकीला कांदे- भुजबळ हा पारंपारिक राजकीय वाद म्हणून वेगळे राजकीय वळण मिळणार आहे.

या मतदारसंघात 32 उमेदवार होते. यातील 18 उमेदवारांनी आज माघार घेतली त्यामुळे 14 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार कांदे आणि अपक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांसह महाविकास आघाडी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गणेश धात्रक आणि मराठा महासंघ पुरस्कृत डॉक्टर रोहन बोरसे या चार उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

Dr Rohan Borse, MLA Suhas Kande, Sameer Bhujbal & Ganesh Dhatrak
Balasaheb Thorat Politics: बाळासाहेब थोरातांची शिष्टाई सफल; धुळ्याच्या पाचही मतदारसंघात बंडखोरांची माघार!

या लढतीला भौगोलिक राजकीय आणि सामाजिक असे विविध अँगल आहेत. त्यामुळे नांदगाव मतदार संघात मनोज जरांगे पाटील फॅक्टर अदृश्यपणे कार्यरत असेल, असे सध्याचे चित्र आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघात निवडणूक लढण्याचे निश्चित केले होते. मात्र शेवटच्या टप्प्यात माघार घेत निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

असे असले तरी कोणाला पाडायचे याचे सूचक विधान जरांगे पाटील यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात जरांगे पाटील यांच्याशी संबंधित पाच उमेदवार होते. यामध्ये विशाल वडघुले, प्रशांत पवार ,नाना बच्छाव आणि पंकज खताळ पाटील या चार जणांनी माघार घेतली आहे. आता डॉक्टर रोहन बोरसे हे एकमेव उमेदवार मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित आहेत.

Dr Rohan Borse, MLA Suhas Kande, Sameer Bhujbal & Ganesh Dhatrak
Eknath Shinde Politics: माघारीचे नाट्य; नॉट रिचेबल अहिरराव अडचणीत तर योगेश घोलप यांना दिलासा!

डॉ. बोरसे यांनी गेल्या आठवड्याभरापासून मतदारसंघात प्रचार देखील सुरू केला आहे. आमदार कांदे यांनी मात्र गेले सहा महिने मतदारसंघात कार्यक्रम व उपक्रमांचा धडाका लावला होता. त्याता माजी खासदार भुजबळ यांनी देखील उत्तर दिले होते. त्यामुळे या पारंपारीक लढतीत. डॉ. बोरसे यांना मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार म्हणूनपाहिले जाते.

नांदगाव मतदार संघात आमदार कांदे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात थेट लढत होईल, असे चित्र सुरुवातीला निर्माण झाले होते. आता मात्र शिवसेना ठाकरे पक्षाचे गणेश धात्रक यांनी या दोघांनाही राजकीय आव्हान दिले आहे. त्यात सामाजिक स्तरावर मराठा समाजाचा उमेदवार म्हणून डॉ बोरसे यांना प्रोजेक्ट करण्यात येत आहे. त्यामुळे आज माघारी नंतर नांदगाव मतदारसंघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com