Shirdi crime update : शिर्डीत ‘वेशांतर गँग’चा खेळ खल्लास! महिलांच्या टोळीचा धक्कादायक कारनामा उघड

Shirdi Police Arrest Andhra Pradesh Women Gang for Stealing Valuables from Devotees at Sai Temple : शिर्डी इथं साई मंदिरात चोरी करणारी महिलांच्या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
Shirdi crime update
Shirdi crime updateSarkarnama
Published on
Updated on

Andhra Pradesh women gang : शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात भाविकांचे मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या 'वेशांतर गँग'ला पकडण्यात शिर्डी पोलिसांना यश आलं आहे.

ही गँग आंध्र प्रदेशमधील असून, त्यात दोन महिला, दोन पुरूष आणि लहान मुलांचा समावेश होता. 10 मोबाइल फोन, 1170 रुपये रोख रक्कम, ब्लेड्स आणि कटर तसेच अल्पवयीन बालकाकडूनही एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

शिर्डीतील (Shirdi) साई समाधी मंदिर परिसरात एका भाविकाची पर्स ब्लेडने कापल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. या तक्रारीनंतर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. यात पोलिसांना चक्रावून टाकणारी माहिती समोर आली.

काही महिला अन् पुरुष साई मंदिर परिसरात संशयास्पदरित्या फिरताना सीसीटीव्हीमधील चित्रीकरणात दिसून आल्या. संशयितांना ताब्यात घेतले असता, एक पुरुष आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. उर्वरित एक पुरुष, दोन महिला आणि एक अल्पवयीन बालक यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे.

Shirdi crime update
Religious conversion pressure case : शिर्डीत खळबळ! 15 वर्षीय मुलीवर धर्मांतरासाठी दबाव; ‘द केरळ स्टोरी’सारखा प्रकार, पोलिस कारवाई सुरू

ताब्यात घेतलेल्या गँगकडून 10 मोबाइल फोन, 1170 रुपये रोख रक्कम, ब्लेड्स आणि कटर तसेच अल्पवयीन बालकाकडूनही एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. या गँगने चोरी केलेले मोबाईल महागड्या कंपनीचे असल्याचे पोलिसांना आढळून आले. ही गँग आंध्र प्रदेशातील असल्याचे पोलिस तपासात समोर आलं आहे.

Shirdi crime update
Eknath Khadse : मंत्र्यांविरोधात अश्लील बोलणं भोवलं? गुन्हा दाखल होताच, एकनाथ खडसेंचा पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध गंभीर हल्लाबोल!

वेशांतर गँगची पाॅलिसी

ही गँग भाविकांसारखाच वेश परिधान करून गर्दीत मिसळाची. महिलांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस घातला होता, तर नंतर साडी परिधान करून पुन्हा परिसरात वावरत. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीतील चित्रीकरण व्यवस्थित तपासल्यानंतर समोर आला. गँगची चोरी करण्याची ही पद्धत पाहून पोलिसही अचंबित झाले.

'आंध्र'मधून गँग ऑपरेट?

या वेशांतराच्या माध्यमातून पोलिस अन् मंदिर सुरक्षारक्षकांची दिशाभूल करण्याचा गँगचा डाव होता. मात्र पोलिसांच्या नजरेतून आंध्र प्रदेशमधील गँगचा हा प्रकार सुटला नाही. शिर्डी पोलिसांनी पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश केला. ही गँग आंध्र प्रदेशमधून चालवली जात आहे का? पसार झालेला कोण? याचा शोध घेण्याचं आव्हान शिर्डी पोलिसांसमोर आहे.

पोलिसांसमोर आणखी एक आव्हान

साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून हजारो भाविक दररोज शिर्डीत दाखल होतात. आधीच परप्रांतीय भिक्षेकर्‍यांचा विषय ऐरणीवर आला असताना आता शिर्डीत परप्रांतीय चोरांच्या टोळ्या देखील सक्रिय असल्याचे समोर आलं. त्यामुळे या चोऱ्यांना आळा घालण्याचे मोठं आव्हान शिर्डी पोलिसांसमोर उभं राहिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com